Thackeray + Pawars ठाकरे + पवारांच्या लाडक्या पिढ्या; ड्रग्स आणि बदनामीच्या लफड्यात अडकल्या!!

नाशिक : ठाकरे आणि पवारांच्या लाडक्या पिढ्या; ड्रग्स आणि बदनामीच्या लफड्यात अडकल्या!!, असेच म्हणायची वेळ ठाकरे आणि पवारांच्या पुढच्या पिढ्यांच्या कर्तुतीतून एकाच दिवशी म्हणजे काल समोर आली. ठाकरेंची पुढची पिढी ड्रग्स रॅकेटमध्ये असल्याचा आरोप झाला, तर पवारांची लाडकी पिढी दुसऱ्या नेत्यांच्या बदनामीच्या रॅकेटमध्ये असल्याचे समोर आले.

दिशा सालियन प्रकरणात गळ्यापर्यंत अडकलेले आदित्य ठाकरे आता ड्रग्स डीलरच्या रॅकेटचा भाग असल्याचा आरोप दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी केला. त्या संदर्भात ते मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटले आणि कोर्टातही त्या संदर्भात त्यांनी मुद्दे मांडले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा गैरवापर करून सगळी प्रकरणे दाबली, असा आरोप सतीश सालियन यांनी कोर्टात केला. कोर्टात आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ असे म्हणणारे आदित्य ठाकरे नेमके याच मुद्द्यावर अडचणीत आले. कारण केवळ माध्यमांमध्ये गाजलेले प्रकरण कोर्टात गेल्यामुळे ते कायद्याच्या कचाट्यात अडकले. पनवेल मधल्या फार्म हाऊस वर असलेले ड्रग्स रॅकेट आणि तिथे होणारा लहान मुलांचा लैंगिक छळ इथपर्यंत प्रकरण आदित्य ठाकरे यांचे प्रकरण पोहचले. डिनो मोरियाचे नाव या सगळ्या प्रकरणांमध्ये आधीच होते, त्यात आदित्यच्या नावाची भर पडली. मग भले आदित्य यांनी कितीही राणा भीमदेवी थाटात विधिमंडळाच्या आवारात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली तरी कोर्टात त्या प्रकरणांना उत्तरे देणे कठीण आहे. कारण तिथे आरोप करणाऱ्या निलेश ओझा आणि सतीश सालियन यांना जसे पुरावे सादर करावे लागतील, तसे आपण निर्दोष असल्याचे पुरावे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सादर करावे लागतील. ही झाली ठाकरे यांच्या लाडक्या पिढीची कहाणी!!

पवारांची पुढची लाडकी पिढी

त्याचबरोबर पवारांच्या लाडक्या पिढीची पुढची कहाणी समोर आली. ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधानसभेतच मांडली. मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात अटक झालेल्या संबंधित महिलेशी आणि पत्रकारांशी थेट सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा संबंध होता, असा आरोप फडणवीस यांनी पुराव्यासह विधानसभेत केला. त्यात त्यांनी प्रभाकर देशमुख हे देखील नाव घेतले. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे सुपारीबाज पत्रकार तुषार खरात अनिल सुभेदार यांच्या संपर्कात राहिल्याचे शेकडो कॉल पोलिसांना सापडले.



जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे सगळे पुरावे त्यात आढळले म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती सगळी कहाणी नावांसकट विधानसभेत मांडली. त्यावेळी आपले नाव आल्यामुळे रोहित पवारांनी विधानसभेतच थातूरमातूर खुलासा करायचा प्रयत्न केला.

पण त्याहीपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया जास्त गंभीर ठरली कारण त्यात त्यांची “थरथरलेली” बॉडी लँग्वेज दिसली. मुख्यमंत्र्यांना गृह खात्याकडून माहिती मिळाली असेल. आणि ती माहिती सभागृहात मांडणी क्रमप्राप्त आहे, असे वाटल्याने त्यांनी ती मांडली असेल अशी “सौम्य” प्रतिक्रिया अजित पवारांनी व्यक्त केली. एरवी अजितदादा कुठल्याही विषयावर आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त करून समोरच्याला गप्प करतात पण जयकुमार गोरे सुप्रिया सुळे रोहित पवार यांनी तसे केले नाही किंबहुना ते बचावात्मक पवित्र्यात दिसले. यातूनच त्या प्रकरणाचे खरे “गांभीर्य” समोर आले.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सकाळी संबंधित विषयावर आरोप केले होते. रोहित पवारांनी त्यावर तातडीने विधानसभेतच प्रतिक्रिया व्यक्त केली, पण सुप्रिया सुळे यांनी लगेच कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्यांनी सायंकाळी उशिरा दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काही खुलासा केले. त्यात नेहमीप्रमाणे त्यांनी आई-वडिलांचे संस्कार यशवंतरावांचे संस्कार टेप वाजवली, पण आपले सुपारीबाज पत्रकार तुषार खरात याच्याशी संपर्क असल्याचे मान्य केले. त्याने आपली मुलाखत घेतली होती, त्यामुळे त्याच्याशी संपर्क होताच, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांनी फक्त या प्रकरणाची सुरुवात विधानसभेत वात लावून करून दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी आणि तपास अजून व्हायचा आहे आणि तो पूर्णपणे फडणवीसांच्या हातात आहे. म्हणूनच अजितदादांची त्यावरची प्रतिक्रिया आणि त्यातली बॉडी लँग्वेज या प्रकरणाचे सगळे खरे “गांभीर्य” सांगून गेले.

पण या सगळ्याचा खरा अर्थ हाच की ठाकरे आणि पवारांच्या लाडक्या पिढ्या आता ड्रग्स आणि बदनामीच्या रॅकेटमध्ये अडकल्या!!, हे उघड्यावर यायला सुरुवात झाली.

Thackeray + Pawars next generation indulged in drugs and defamation cases

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात