प्रतिनिधी
देहरादून : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या काळातील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न चांगलाच वादात राहिला. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या संदर्भातील याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यादरम्यानच राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या पत्राबाबत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशियारींनी गौप्यस्फोट केला आहे. १२ आमदारांच्या नियुक्ती पत्रावर सही का केली नाही?, याचे स्पष्टीकरण दिले आहे. Bhagat Singh koshiyari targets Uddhav Thackeray and sharad Pawar over 12 nominated mac’s issue
पत्रात धमकीची भाषा
मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत भगतसिंह कोशियारी यांनी सविस्तर खुलासा केला. ते म्हणाले, की, १२ आमदार नियुक्त्यांच्याबाबत मला महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने येऊन पत्र दिले. हे पाच पानांचे पत्र होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. पण त्या पाच पानांच्या पत्रात राजपालांना तुम्ही धमकी देताय आणि सांगतायत, हे कायदे, ते कायदे. आणि शेवटी लिहिलंय, १५ दिवसांच्या आत नियुक्त्या करा. मुख्यमंत्री राज्यपालांना असं सांगू शकतात?, हे कुठल्या संविधानात लिहिलंय? कुठल्या घटनेत तसं लिहिलंय?, शरद पवारही मुख्यमंत्री होते. त्यांनी असे पत्र राज्यपालांना लिहिले असते का?, असा प्रतिसवालच कोशियारी यांनी करून ठाकरे – पवारांवर निशाणा साधला आहे
राज्यपालांचे वक्तव्य : उदयनराजेंनी टोचल्यामुळे आधी पवार बोलले, त्यामुळे उद्धवजींना बोलावे लागले; फडणवीसांचे टोले
पुढे कोशियारी म्हणाले, ‘जेव्हा ते पत्र पुन्हा कधी समोर येईल, तेव्हा त्यात काय सत्य आहे, त्याचा उलगडा होईलच. मात्र त्या पत्राच्या दुसऱ्याच दिवशी मी नियुक्त्या करणार होतो. पण अशा प्रकारे तुम्ही पत्र लिहिता, ज्यात धमकीची भाषा असते. त्यामुळे मी पत्रावर सहीच केली नाही.
‘माझे महाविकास आघाडीशी संबंध चांगले होते, पण त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कोण होते? त्यांचे आमदार माझ्याकडे येऊन, म्हणायचे, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा!! उद्धव ठाकरे तर शकुनीमामाच्या फेऱ्यात अडकले होते. आता त्यांचा शकुनीमामा कोण होता हे मला काय माहिती?, असे वक्तव्य करून कोशियारी यांनी संशयाची सुई शरद पवार आणि संजय राऊत यांच्याकडे फिरवून ठेवली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App