वृत्तसंस्था
मुंबई : काेराेनाचा नवा विषाणू वेगाने पसरत असून आठवड्याला ८ ते १० टक्क्याने केसीस वाढत आहेत. त्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांन अधिकाऱ्यांना दिले आहेत. एक पत्रक व्यास यांनी जारी केले आहे. Beware of corona; Corona patients on the rise in Mumbai; Health Secretary’s instructions to take precautions
गेल्या काही आठवड्यांपासून काेराेना बाधितांचा आकडा घसरला होता. मात्र दक्षिण आशियायी देशांत दिसणारी वाढ आता चीन आणि युरोपातही दिसू लागल्याचे पत्रकात म्हटले आहे. दोन वर्षात दिसली नाही, इतकी वाढ २४ तासात काही देशांत नोंदविली आहे.
इस्रायलसह अन्य काही देशांत नव्या विषाणूंमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. गर्दी टाळावी, मास्कचा वापर करा, लसीकरण वाढवा, याबाबत राष्ट्रीय सरासरीच्या मागे आहोत, असे या पत्रकात म्हटले आहे. सध्या अवघ्या दोन हजार सक्रिय रुग्णांमुळे स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, अवघ्या काही आठवड्यांतच यात लक्षणीय बदल होऊ शकतो, असे व्यास यांनी पत्रकात म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App