
विशेष प्रतिनिधी
मुंबई : हिंदूत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या वेगळ्या गोष्टी नाहीत, हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता आहे. देशामध्ये बंधुभाव, विविधतेतील एकता आज सुद्धा टिकून आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच येत नाही, तुम्ही मान्य करा अथवा नका मान्य करून पण भारत हिंदू राष्ट्रच आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.Believe it or not, Bharat Hindu Rashtra itself, Sarsanghchalak Mohan Bhagwat made it clear
एका दैनिकाच्या कार्यक्रमात हिंदूत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या मुद्यावर मोहन भागवत यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले. ते म्हणाले, देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक हे गुण्यागोविंदाने राहतात. धारण करणारा नियम म्हणजे धर्म आहे. हिंदू हा धर्म नाही, तो सनातन काळापासून चाललेली परंपरा आहे. आचरण केलेली पद्धत आहे. हिंदू हे इझम नाही. सनातन काळापासून सुरू असलेला सर्वसमावेश धर्म आहे, त्याला आज आपण हिंदू धर्म म्हणतो.
सरसंघचालक म्हणाले, हिंदूत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या वेगळ्या गोष्टी नाहीत. हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता आहे. हा कोणताही धर्म नाही, आचारणा आणलेली परंपरा आहे. देशात आज बंधुभाव आणि विविधतेतील एकता आजही टिकून आहे, त्यामुळे हिंदू राष्ट्र घडवण्याचा विषय नाही, तुम्ही मान्य करा किंवा नका करू भारत हे हिंदू राष्ट्रच आहे.
परिस्थितीनुसार आचार विचार बदलत असता, त्यामुळे या परिस्थितीमुळे आचार धर्म बदलत राहतो. याला चिकटून राहणे चुकीचे आहे, काळानुसार बदल घडत असतो, तो स्वीकारणे काळाची गरज आहे. प्राचीन काळापासून अनेक पद्धती,
रिती आणि परंपरा चालत येत आहे. यात आता बदल झालेला आपल्याला पाहण्यास मिळत आहे. म्हणून हिंदूत्व शाश्वत आहे, आचरण पद्धतींवर केलेले संस्कार म्हणजे संस्कृती आहे, त्यामुळे हिंदूत्व हे संस्कृतीचे नाव आहे.
Believe it or not, Bharat Hindu Rashtra itself, Sarsanghchalak Mohan Bhagwat made it clear
महत्त्वाच्या बातम्या
- किरीट सोमय्या यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
- पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा चरणजीत चन्नी, राहुल गांधींची लुधियानात घोषणा; नवज्योत सिद्धूंना जबर धक्का
- लता मंगेशकर यांच्या निधनावर नेपाळ, पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, इम्रान खान म्हणाले- उपखंडाने एक महान गायिका गमावली!
- पंतप्रधान मोदींकडून शिवतीर्थावर लतादीदींच्या पार्थिवाचे दर्शन, श्रद्धांजली; मंगेशकर कुटुंबियांचे केले सांत्वन