बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला कोर्डिलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणात अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना लक्ष्य करत खळबळजनक आरोप केले होते.behalf of Shiv Pratishthan Hindusthan in support of NCB officer Sameer WankhedeMovement
विशेष प्रतिनिधी
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील आरोप – प्रत्यारोपांची मालिका वाढतच आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला कोर्डिलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणात अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना लक्ष्य करत खळबळजनक आरोप केले होते.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ साताऱ्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने आंदोलन करण्यात आले.आंदोलनात ओंकार डोंगरे, ऋषी कणसे, गणेश शिंदे, अक्षय शिंदे, हर्षल माळी व इतर शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
समीर वानखेडे यांनी क्रुझवरील पार्टीवर छापा टाकत आर्यन खानसह इतरांना अटक केल्यानंतर त्यांना जाणीवपूर्वक लक्ष करण्यात आले आहे.
देशात अंमली पदार्थांचा वापर वाढत असून, तो युवापिढीसाठी घातक आहे.वानखेडेंसारख्या अधिकाऱ्याला लक्ष करत युवा पिढीचे नुकसान करण्याचा प्रकार धोकादायक असल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे या वेळी देण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App