वृत्तसंस्था
सांगली : कोरोनाच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून पाच दिवस १९ तारखेपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. याला विरोध करत आज व्यापाऱ्यांनी हरभट रोडवरच्या बाजारपेठेत भीक माँगो आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. ता माध्यमातून त्यांनी आपल्या व्यथा शासन दरबारी पोहचवण्याचा प्रयत्न केला. Begging movement of traders in Sangli; Strong protest against five-day corona restrictions
सांगली जिल्ह्यात कोरोना पोजिटिव्ह रेट वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा लॉकडाउन घोषित केला आहे. आजपासून त्याची सुरवात झाली आहे.. मात्र याला सांगलीच्या व्यापाऱ्यांनी विरोध केला.आज व्यापाऱ्यांनी भीक माँगो आंदोलन केले. यावेळी हातात बोर्ड घेऊन भीक मागितली..
प्रशासनाने आमच्या या मागण्या मान्य कराव्यात, अशा आशयाचे बोर्ड व्यापाऱ्यांनी हातात धरले होते. कर्मचारी पगार , व्याज , पाणीपट्टी, GST, दुकान भाडे कर्जाचे हफ्ते , घरपट्टी , वीजबिल, आयकर, घरखर्च या न्याय्य हक्कांच्या मागण्यांची सरकारने आम्हाला भीक द्यावी, असे म्हणत हे आंदोलन करण्यात आले.
सांगली बाजारपेठ गेल्या तीन महिन्यापासून संकटात आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नेमलेली टास्क फोर्स सरकारने प्रथम बरखास्त करावी. कारण ही टास्क फोर्स चार भिंतीत बसून निर्णय घेते. त्यामुळे कधी लॉक तर कधी अन लॉक असे होते. त्यापेक्षा या टास्क फोर्स मध्ये स्थानिकांचा समावेश करावा. – समीर शाह, व्यापारी, कोल्हापूर
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App