काँग्रेसचा पतंग काटण्यापूर्वी भाजपने दिली ढील; राज्यसभा निवडणुकीला लावले बिनविरोधाचे सील!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभा निवडणुकीसाठी चौथा उमेदवार न देता भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा इरादा व्यक्त केला. याचा अर्थ पक्षाने काँग्रेसचा पतंग काटण्यापूर्वी त्याला ढील दिल्याचे मानण्यात येत आहे.Before cutting the kite of Congress, BJP gave a break; Rajya Sabha Election Sealed Unopposed!!

राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्षाकडे मतांचा पुरेसा कोटा आहे, असे वक्तव्य करत भाजप चौथा उमेदवार देणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.



याचा अर्थ भाजपने राज्यसभा निवडणुकीत स्वतःपेक्षा काँग्रेसचे शक्ती परीक्षण टाळले आहे. कारण काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे या दलित नेत्याला उमेदवारी देऊन राज्यसभेच्या मैदानात उतरवले होते आहे. अशावेळी भाजप चौथा उमेदवार देऊन काँग्रेसचा उमेदवार पराभूत करण्याच्या स्थितीत असताना देखील भाजपने ती लढत टाळली आहे.

भाजपला स्वतःचा चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसची मते फोडावी लागली असती. अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ काही आमदार गळाला लावता आले असते, पण हे सगळे करताना भाजपवरचा फोडाफोडीचा आरोप अधिक गहिरा झाला असता. त्याऐवजी राज्यसभा निवडणूक बिनविरोध करत काँग्रेसला गाफील ठेवण्याची रणनीती भाजपने स्वीकारल्याचे दिसत आहे.

राज्यसभेत भाजपला आत्ता व्यवस्थित बहुमत आहे. महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अथवा शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे दोन खासदार आधीच कमी झाले आहेत. कारण राज्यसभा निवडणुकीत त्यांचे खासदार निवडून आणण्याचा त्यांचा मतांचा कोटाच उरलेला नाही. तो कोटा अजित पवार आणि एकनाथ शिंदे आपल्याकडे घेऊन गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचेच माजी खासदार मिलिंद देवरा यांना राज्यसभेचे तिकीट देऊन शिवसेनेची सीट पक्की केली आहे. उरलेली सीट अजित पवारांना देऊन महायुतीतली पाचवी सीट पक्की होणार आहे.

त्यामुळे काँग्रेसला फक्त एक सीट मिळणार असून ती चंद्रकांत हंडोरे यांची असणार आहे. भाजपने निवडणूक टाळून चंद्रकांत हंडोरे यांचा निवडणुकीचा मार्ग सुरक्षित करून दिला आहे. याचाच नेमका राजकीय अर्थ असा की, भाजपच्या रणनीतीकारांनी काँग्रेसचा पतंग काटण्यापूर्वी त्या पतंगाला थोडी ढील दिली आहे.

Before cutting the kite of Congress, BJP gave a break; Rajya Sabha Election Sealed Unopposed!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात