विशेष प्रतिनिधी
अमरावती : सलग आठ दिवस कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी ४८ कामगारांना कामावरून काढून टाकले होते. परंतु, अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे या कामगारांचा रोजगार वाचला आहे. Because of Yashomati Thakur 48 Workers jobs were saved in Amravati
अमरावती लगतच्या नांदगाव पेठ MIDCमध्ये काँग्रेसच्या कामगार सेलचे अध्यक्ष पंकज शेंडे यांच्या नेतृत्वाखाली काही कामगारांचे आंदोलन सुरू होते. पालकमंत्री यशोमती ठाकूर या आंदोलनाच्या ठिकाणी पोचल्या. सुदर्शन जिन्स कंपनीने ४८ स्थानिक कामगारांना कामावरुन काढून टाकल्याने हे आंदोलन सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या आंदोलनाची तातडीने दखल घेत मंयशोमती ठाकूर यांनी कंपनी प्रशासनाला आंदोलन ठिकाणी बोलावले. तसेच ८ दिवस कामावर आले नाही म्हणून ४८ कामगारांना कामावरुन काढता येणार नाही, असे बजावले. तसेच या कामगारांना कामावर परत घेण्याची सूचना केल्या. कंपनीने कामगार कायद्याचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले. कामगारांनाही अशाप्रकारे सुटी घेणे चुकीचे असल्याचे सांगत यशोमती ठाकुर यांनी वादावर आंदोलनाच्या ठिकाणीच तोडगा काढला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App