दहशतवाद तसे नक्षली कारवाया, अंमली पदार्थ विरोधी कारवाया तसेच अनेक गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या डॉग स्कॉडचा मोठा उपयोग होतो. Baramati to have ‘Dog Squad’ training center; Information given by Deputy Chief Minister Ajit Pawar
विशेष प्रतिनिधी
बारामती : महाराष्ट्रातील पोलिस श्र्वानांचे प्रशिक्षण केंद्र पुण्यातील शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात आहे, हे प्रशिक्षण केंद्र १९६५ पासून सुरू झाले आहे.दरम्यान आता बारामती येथे आता पोलिस श्र्वानांचे प्रशिक्षण केंद्र होणार आहे. ही माहिती उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिली.
दहशतवाद तसे नक्षली कारवाया, अंमली पदार्थ विरोधी कारवाया तसेच अनेक गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या डॉग स्कॉडचा मोठा उपयोग होतो. बारामतीतील हे प्रशिक्षण केंद्र बारामती अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ होणार आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी २० एकर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या केंद्रासाठी ५० कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती देखील अजित पवारांनी दिली.
पुढे अजित पवार म्हणाले की , पोलिसांचे हे प्रशिक्षित श्वान मानवी जीवांच्या रक्षणासाठी आजपर्यंत मोठी कामगिरी करत आले आहे.ज्यावेळी पोलिसांचे काम अधिक कठीण असेल त्या काळात हे प्रशिक्षित डॉग स्कॉड त्यांच्या मदतीला येऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App