Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; ॲड. आकाश मोरे यांना उतरवणार रिंगणात

Sunetra Pawar

विशेष प्रतिनिधी

बारामती : Sunetra Pawar राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीने केलेले प्रयत्न निष्फळ ठरले असून, काँग्रेसने या मतदारसंघात आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आकाश विश्वनाथ मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून, आता बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध आकाश मोरे असा थेट सामना रंगणार आहे.Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मोठी मोर्चेबांधणी केली होती. खुद्द सुनेत्रा पवार यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून पाठिंब्याचे आवाहन केले होते. मात्र, ‘लोकशाहीत निवडणुका लढवणे गरजेचे आहे’ अशी भूमिका घेत काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय कायम ठेवला. रविवारी उशिरा दिल्लीतून आकाश मोरे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली.Sunetra Pawar



आकाश मोरेंची प्रतिक्रिया

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आकाश मोरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमचा मूळ शत्रू भाजप असल्याचे ते म्हणाले. बारामतीमध्ये अनेक मुद्दे असून त्यामध्ये अजित पवारांच्या अपघाताच्या तपासाचा मुद्दाही आहे, या मुद्द्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. सरकारने अजित पवारांच्या अपघातावर गुन्हा दाखल केला तर उमेदवारी मागे घेऊ, असेही आकाश मोरे यांनी म्हटले आहे.

ठाकरे – पवार गटाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या दोन्ही पक्षाकडून उमेदवार दिला जाणार नाही. तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि इतर काही पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत आकाश मोरे?

काँग्रेसने बारामतीच्या रणांगणात उतरवलेले आकाश मोरे हे पक्षाचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत.
ते सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
माजी आमदार विश्वनाथ मोरे यांचे ते सुपुत्र असून त्यांना राजकीय वारसा लाभला आहे.
विशेष म्हणजे, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते, तेव्हाही आकाश मोरे यांनी अजित पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. त्यामुळे बारामतीचा भूगोल आणि राजकीय समीकरणे त्यांना परिचयाची आहेत.
सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज

काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे सोमवारी सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ स्वतः बारामतीत उपस्थित राहणार असून शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

सुनेत्रा पवार यांच्यासमोर आता काँग्रेसचे अधिकृत आव्हान उभे राहिल्याने, बारामतीची ही पोटनिवडणूक राज्यभरासाठी प्रतिष्ठेची आणि कुतूहलाची ठरणार आहे. अजित पवारांनंतर बारामतीचा गड कोण राखणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Baramati Bypoll: Congress Fields Adv. Akash More Against Sunetra Pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात