पुणे शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या बालगंधर्व नाट्यमंदिराचा 55 वा वर्धापन दिन!


त्यानिमित्त या सांस्कृतिक ठेवीच्या इतिहासाचा हा आढावा.


विशेष प्रतिनिधी

पुणे : बालगंधर्व रंगमंदिर जगभरातील मराठी रसिकांचं कलाकारांचं श्रद्धास्थान. पुणे शहराच्या समृद्ध अशा सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देणारं हे नाट्यगृह. अनेक दिग्गज कलाकारांच्या सहवासानं आणि त्यांनी सादर केलेल्या कलेच्या उत्कट अशा कलाकृतींची साक्ष देणार हे रंग मंदिर.कला आणि साहित्य विश्वात आपलं नाव अजरामर करणाऱ्या दोन दिग्गजांच्या नावाशी हे नाट्यगृह जोडलं आहे.Bal Gandharv rangmandir history

1962 मध्ये महाराष्ट्राचं लाडक व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांच्या पुढाकारातून नाट्यगृहाच्या उभारणीला सुरुवात झाली. आणि दस्तूर खुद्द बालगंधर्व यांच्या हस्ते या नाट्यगृहाची पायाभरणी झाली.



तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 1968 मध्ये या रंगमंदिराचं लोकार्पण झालं. तेव्हा झालेला या रंगमंदिराचा उद्घाटन सोहळा आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

तेंव्हा पासून गेली 50 वर्ष मराठी मनावर हे नाट्यगृह अधिराज्य गाजवतआहे. त्या काळात अतिशय भव्य आधुनिक, वातानुकूलित असणार हे नाट्यगृह, कलाकारांसाठी नाट्य पंढरी ठरलं. तर प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने रंगमंदिर. आज या नाट्यगृहाचा 55 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय
आजवर कला क्षेत्रातील पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या दिग्गजांपासून तर नवोदित कलाकारांपर्यंत अनेकांनी या नाट्यगृहाच्या रंगमंचावर आपली कला सादर केली.

या नाट्य मंदिराने या क्षेत्रातील अनेक पिढ्या घडताना पाहिल्या पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात जर आपल्या कलाकृतीसाठी हाउसफुल चा बोर्ड लागला तर ती कलाकृती जगभरात कोठेही दणक्यात चालते. असा अनेक कलाकारांचा आजही विश्वास आहे. ओटीटीच्या काळात देखील आजही बालगंधर्व नाट्य मंदिराच्या बाहेर हाऊसफुल चा बोर्ड आणि मोगराच्या गजराचा सुगंध कायम दरवळत असतो.

मध्यंतरी या नाट्यगृहाच्या पुनर्विकासाचा मुद्दा समोर आला होता मात्र पुणेकरांनी त्याला नापसंती दर्शवली होती.कुठल्याही शहराची श्रीमंती कलादालने, नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि उद्यानांच्या संख्येवर अवलंबून असते. पुणे याबाबत श्रीमंतं याची साक्ष बालगंधर्व रंगमंदिर कायम देत आलं आहे.

Bal Gandharv rangmandir history

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात