Badlapur Case :  सरकारी बुलडोझर चालण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात लोकांकडूनच अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड!!

Badlapur Case

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये बलात्कारासारखा गंभीर गुन्हा केला किंवा अगदी दगडफेकीसारखी मस्ती केली, तरी सरकारी बुलडोझर गुंड आणि गुन्हेगारांच्या घरांवर चालल्याची उदाहरणे पाहून महाराष्ट्रात देखील बदलापूरचा गुन्हेगार अक्षय शिंदे यांच्या घरावर सरकारी बुलडोझर चालेल, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत होती. परंतु, प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. शेवटी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड लोकांनीच करून टाकली.

बदलापूरमधल्या एका शाळेत दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी शाळेत सफाई कामगार असलेल्या आरोपीला अटक केली. अक्षय शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अक्षय शिंदे यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. ज्या गावात तो राहात होता, तिथल्या त्याच्या घराची काही लोकांनी ही तोडफोड केली असून अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनाही गावातून बाहेर काढण्यात आले. बदलापूरमधल्या खरवई या गावात अक्षय शिंदेचे घर आहे. मिळालेल्या माहितीनुसार घराला बाहेर कुलूप होते, पण लोकांनी घराच्या काचा फोडून आतल्या सामनाची तोडफोड केली.

कोण आहे अक्षय शिंदे?

अक्षय शिंदे हा बदलापूरच्या आदर्श शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता. तो 24 वर्षांचा आहे. शाळेत साफ सफाई करण्याबरोबरच लहान मुला-मुलींना स्वच्छतागृहात घेऊन जाण्याचं काम तो करत होता. मुलं अक्षयला काठीवाला दादा म्हणून ओळखायचे. कंत्राटी पद्धतीवर अक्षयला बदलापूरच्या शाळेत नोकरी मिळाली होती.  आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत डांबण्यात आले. आरोपी अक्षय शिंदेचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये, असं आवाहन कल्याण वकील संघटनेनं केलंय. बदलापूर लैंगिक अत्याचार खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलीये. तपासातील उणिवा शोधणं हे मुख्य काम असणार आहे, असे निकम यांनी स्पष्ट केले.


 जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी भाजपकडून राम माधव, जी.किशन रेड्डींवर विशेष जबाबदारी!


 

बदलापूर घटनेचे राज्यभर पडसाद

बदलापूर येथील शाळकरी चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचाराचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले आहेत. राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी आंदोलन केली. बदलापुरात सध्या तणावपर्ण शांतता आहे आणि सुरक्षेसाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. सध्या बदलापुरात शाळांना सुट्टी देण्यात आलीय. इंटरनेट सेवाही बंद  ठेवली.

एसआयटीचा तपास सुरु

बदलापूर अल्पवयीन मुली अत्याचार प्रकरणी, नेमलेल्या SIT टीमने पीडित मुलीच्या पालकांची भेट घेतली. बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 2 चिमुरडींवर अत्याचार झाला. या घटनेच्या निषेधार्थ काल पालकांनी बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी SIT टीम स्थापन करण्यात आली. या टीमनं दोघींच्याही पालकांचा जबाब नोंदवला.

Badlapur Case bulldozar on akshay shinde home

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात