नाशिक : राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या रुपाने भाजपचे तिसरी जागा निवडून आल्यानंतर पक्षांमध्ये आनंदाचे उधाण येणे स्वाभाविक आहे. विविध नेत्यांनी त्यावर आनंदाच्या प्रतिक्रिया व्यक्त करणे हे देखील अधिक स्वाभाविक आहे. Bacchu Kadu targets Pawar, raut and chandrakant patil at once
पण धनंजय महाडिक यांच्या विजयाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अतिउत्साहाच्या भरात जी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, त्या प्रतिक्रियेवरून महाविकास आघाडीचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांना जोरदार टोला हाणत जमिनीवर आणले आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची स्तुती करताना मध्येच शरद पवार यांचा विषय देखील आणला आहे.
शरद पवार मोकळेपणाने आपल्या विरोधकांचे कौतुक करत असतात, असे सांगताना चंद्रकांतदादा म्हणाले होते, की माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आणि त्यांनी चमत्कार घडवला..’ ही शरद पवार यांची प्रतिक्रिया बोलकी आहे… आमचे देवेंद्रजी आहेतच तसे! प्रतिस्पर्ध्यांच्या यशाचं मनमोकळं कौतुक करणं आणि आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे…!!, अशी बोलकी प्रतिक्रिया चंद्रकांत दादा यांनी व्यक्त केली.
– पवारांच्या भाजप कौतूकात वेगळा डाव
मात्र या मुद्द्यावरच नेमकेपणाने बोट ठेवत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिवसेनेला सुनावताना “लेकी बोले सुने लागे” या न्यायाने चंद्रकांतदादांनाही सुनावून घेतले आहे. बच्चू कडू म्हणाले, की शिवसेनेने पक्षांना उगाच बदनाम करू नये. एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल. पण शरद पवारांच्या मनात काय चालले आहे हे मोजता येणार नाही. पवारांनी भाजपच्या केलेल्या कौतुकात वेगळा डाव असू शकतो!!” बच्चू कडू यांनी एक प्रकारे राज्यसभेच्या निवडणूक निकालावर अतिशय कमीत कमी शब्दात सटीक भाष्य केले आहे.
– निलेश राणे यांचे ट्विट
अशाच प्रकारचे भाष्य भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी देखील करून शरद पवार हे शब्द फिरवण्यात आणि पलटी मारण्यात कसे वाकबगार आहेत, अशा आशयाचे ट्विट केले होते. बच्चू कडू यांनी देखील चंद्रकांतदादा पाटील यांना सुनावताना जे विधान केले त्यातूनही राज्यसभा निवडणुकीतील पवारांच्या खेळीवर पुरेसा प्रकाश पडताना दिसतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App