विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी एक ट्विट केले. आहे. ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात , “बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch! कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र!” Baap Bete will go to jail; Sanjay Raut’s tweet
संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. तेव्हा भाजप नेते किरीट सोमय्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले. सोमय्या यांच्या मुलावरही आरोप केले. त्यानंतर भाजपकडूनही संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर आज संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले.
सोमय्या यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेचे आरोप करत राऊत यांना पुन्हा आव्हान दिले. त्यापूर्वी राऊत यांनी हे ट्विट केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App