आता पुन्हा सोमवारी २० तारखेपासून औरंगाबाद शहरातील पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Aurangabad school bell will ring from tomorrow!
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून प्राथमिक शाळा बंद होत्या. १ डिसेंबरनंतर शाळा सुरू होईल असे देखील सांगितले गेले होते. परंतु कोव्हीड मुळे पुन्हा शाळा सुरू होणार नाही असे मनपाने स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पुन्हा सोमवारी २० तारखेपासून औरंगाबाद शहरातील पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय कोविडच्या रुग्णांचा आकडा कमी झाला असला तरी कोविडचे नियम पाळूनच शाळा सुरू कराव्या लागणार आहे.तशा सूचना देखील शाळांना देण्यात आल्या आहेत.
१)शाळा सुरू होताच पहिल्या दिवशीपासून विद्यार्थ्यांना शाळेत मास्क लावूनच प्रवेश दिला जाणार आहे. २) विद्यार्थ्यांना थर्मल गनद्वारे तपासणी करणे, विद्यार्थ्यांना ताप, सर्दी, खोकला किंवा इतर लक्षणे आढळून आल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवून डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जाणार आहे. ३) याशिवाय वर्गात सुरक्षित अंतर ठेवून शाळेतील जागेनुसार विद्यार्थ्यांना बसविण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App