विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर दाखल बलात्काराच्या गुन्ह्यात बलात्कार प्रकरणातील बी समरी रिपोर्ट औरंगाबादच्या जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केला असून बलात्कार प्रकरणी पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे आदेश देताना न्यायालयाने पोलिसांवरही ताशेरे ओढले आहेत. AURANGABAD: aurangabad district sessions court quashed b summary report of Rashtrawadi Congress’s mahebub shaikh accused rape case
न्यायालयाने काय आदेश दिले ?
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एक बलात्काराराच गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच बलात्काप्रकरणी शेख अडचणीत आलेले आहेत. सध्या या प्रकरणआवर औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी आज न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले. न्यायालयाने मेहबुब शेख यांच्यावर आरोप करण्यात आलेल्या बलात्कार प्रकरणातील बी समरी रिपोर्ट रद्द केला आहे. तसेच या बलात्कार प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास कारा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पोलिसांवर ताशेरे ओढले
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब ईब्राहिम शेख याच्यावर अत्याचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात काहीही तथ्य नसल्याचा पाेलिसांनी दिलेल्या बी समरी अहवालावरून न्यायालयाने पोलिसांना चांगलेच झोडपले. हा बी समरी अहवाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सचिन न्याहारकर यांनी फेटाळला.
हा तर तक्रारकर्तीला खोटे पाडण्याचा डाव
या प्रकरणात राजकीय दबावाखाली तपासी अधिकाऱ्यांनी तपास केल्याचे दिसत आहे. फिर्यादी तथा पीडितेच्या म्हणण्याऐवजी आराेपीच्या म्हणण्यानुसार तपास करण्यात आला. तसेच फिर्यादीलाच या प्रकरणात खाेटे ठरवण्याचा प्रयत्न केलेला दिसत असून याप्रकरणात आता सिडकाे पाेलीस ठाण्याचे निरीक्षकांनी तपास करून पाेलीस आयुक्तांनी यामध्ये याेग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करावे, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच पाेलिसांनी दिलेला बी समरी अहवालात सहायक सरकारी वकील जयमाला राठाेड यांनी याेग्य ते पुरावे जाेडलेले नसून स्वीकारणे याेग्य नाही. त्यामुळे हा अहवाल रद्द करावा, असे न्यायालयात सांगितले.
पोलिसांना घटनेवर शंका
पाेलिसांनी तपास करून या प्रकरणात कुठलेही तथ्य नसून पीडिता आणि आराेपी यांची भेट झाल्यावरही शंका उपस्थित केली हाेती. सीसीटीव्हीतही दाेघे कुठे भेटल्याचे दिसत नाही, असे पाेलिसांनी सांगितले हाेते. त्यावरून पाेलिसांकडून बी समरी अहवाल सादर करण्यात आला असून न्यायालयाने वरील मुद्दे उपस्थित करून फेटाळला.
काय आहे प्रकरण
सहायक पाेलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी बी समरी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. याप्रकरणी पीडितेने आपले म्हणणे मांडण्यासाठी ॲड. आय. डी. मनियार यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब ईब्राहिम शेख (रा. शिरूर जि. बीड) यांच्याविरुद्ध 28 डिसेंबर 2020 राेजी सिडकाे पाेलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 वर्षीय पीडित तरुणी उच्च शिक्षित आहे. नाेकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्यासाठी म्हणून 14 नाेव्हेंबर 2020 राेजी रात्री शेख यांनी कारमध्येच अत्याचार केला. आपण प्रतिकारही केला. मात्र, ताेंड दाबून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने केलेले आराेप मेहबूब शेख यांनी समाजमाध्यमावरून प्रतिक्रिया देत फेटाळले हाेते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App