Atul Benke : तारेवरची कसरत करून आमदारकीची सेफ सोय; अतुल बेनकेंचे दोन डगरींवर पाय!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शरद पवार आणि अजित पवार यांनी आपापल्या सोयीनुसार आपले वेगळे राजकीय मार्ग आखल्यानंतर त्यांच्या अनुयायांची पंचाईत झाली. पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अनुयायांनी तारेवरची कसरत करून आमदारकीची सेफ सोय करून घेतली. अशीच सोय करून घेणाऱ्यांमध्ये जुन्नरचे आमदार अतुल बेनके पुढे आले आणि दोन डगरींवर पाय ठेवत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. Atul Benke safe game to save assembly seat

अतुल बेनके यांनी शरद पवार यांच्या जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यानिमित्ताने मोठी बॅनरबाजी केली. त्या बॅनरवर शेतकऱ्यांचे मार्गदर्शक शरद पवार यांचे हार्दिक स्वागत असे लिहिण्यात आले आहे. बॅनरवर आमदार अतुल बेनके, शरद पवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांचे फोटो लावले. परंतु अजित पवार यांचा फोटो लावला नाही. त्यावर बेनके यांची स्वत:च स्पष्टीकरण दिले. आपण अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढील विधानसभेला सामोरे जाणार आहे. परंतु शरद पवारांचे विचार घेऊनच पुढे जाणार असल्याचे पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Narendra Modi : ‘कीव’मध्ये पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत, राष्ट्राध्य झेलेन्स्कींशी विशेष भेट


काय म्हणाले अतुल बेनके

माझी लढाई शरद पवारांच्या विरुद्ध आहे असे समजायचे कोणी कारण नाही. पण माझा शरद पवार यांच्या गटांमध्ये प्रवेशसुद्धा नाही. कोणीही त्याचा वेगळा अर्थ काढू नये. शरद पवार येणार म्हटल्यावर त्यांचे स्वागत करणे हे माझे कर्तव्य होते. जशी कौटुंबिक नात्याने पवार फॅमिली एक आहे. तसेच माझ्यासोबत त्यांचे नाते आहे. मी घड्याळ चिन्हावर विधानसभा निवडणूक लढणार आहे. मात्र मी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सोबत सुद्धा आहे, असे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

अमोल कोल्हेंसोबत काम करणार

शिरूरच्या जनतेने अमोल कोल्हे यांना निवडून दिले आहे. त्यामुळे विकासासाठी अमोल कोल्हे यांच्या सोबत असणार आहे. अमोल कोल्हे पुढचे पाच वर्षे खासदार राहणार आहे आणि पुढचे पाच वर्ष मी आमदार राहणार आहे. अमोल कोल्हे हे खासदार म्हणून तर मी आमदार म्हणून आम्ही दोघे तालुक्याचा विकास करणार आहोत. राजकारणाच्या पलीकडे जुन्नर तालुक्यातील दोन लोक एकत्र येतात आणि तालुक्याचा विकास करतात हा आदर्श निर्माण होणार आहे. जुन्नर तालुक्याचा हा संस्कार आणि संस्कृती आहे, असा आदर्श इतर तालुक्याने घ्यावा असे अतुल बेनके यांनी सांगितले. मी विकास कामाच्या माध्यमातून पुढे येत आहे. त्यावेळी कोणी आंदोलन केली तरी मी पुढे गेल्याशिवाय राहणार नाही.

भाजप नेत्या आशा बुचके यांनी माझ्यावरती वैयक्तिक टीका केली आहे. तालुक्यातील जनता पाहत आहे की कोण किती संस्कार क्षण आहे आणि कोण किती संस्कृत आहे. आशा बुचके यांनी आंदोलन केले त्यांचा गैरसमज झाला असे मला वाटले होते. मात्र त्यांचा गैरसमज नसून त्यांनी जाणून-बुजून हे आंदोलन केले आहे, असे आमदार बेनके यांनी सांगितले.

Atul Benke safe game to save assembly seat

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात