दरम्यान, कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर शर्मा यांनी जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. मी तपासकार्यात सहकार्य करण्यास तयार असून मला जामीन द्यावा, असं शर्मा यांनी कोर्टाला स्पष्ट केलं आहे.Atrocities case: Karuna Sharma remanded in judicial custody for 14 days, driver in police custody for one day.
विशेष प्रतिनिधी
बीड : सामाजिक कार्यमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या करुणा शर्मा यांना रविवारी (5 सप्टेंबर) परळी येथून अटक झाली आहे. त्यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर शर्मा यांनी जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. मी तपासकार्यात सहकार्य करण्यास तयार असून मला जामीन द्यावा, असं शर्मा यांनी कोर्टाला स्पष्ट केलं आहे.
परळीत येऊन अनेकांचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा करुणा शर्मा यांनी दिला होता. वैद्यनाथ मंदिरात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. यापार्श्वभूमीवर परळीत वैद्यनाथ मंदिराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.
परंतु याठिकाणी करुणा शर्मा यांची दोन महिलांशी बाचाबाची झाली. विशाखा घाडगे आणि गु्ड्डी तांबोळी असं या महिलांचं नाव असून तुम्ही पैसे घेऊन इथे आला आहात असा आरोप करुणा शर्मा यांनी केला.दोन्ही महिलांनी करुणा शर्मा यांच्याविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
‘या आरोपासह करुणा शर्मा यांनी आम्हाला मारहाण केली. जिवे मारण्याच्या उद्देश्याने गुड्डी तांबोळी हिला चाकूने मारलं.’ अशा आशयाची तक्रार शर्मा यांच्याविरोधात करण्यात आली आहे.शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं.
त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं.
परळीत आल्यानंतर आपल्या अंगावर जमाव धावून आला होता, अशी तक्रार शर्मा यांनी परळी शहर पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी 70 ते 80 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शहरात प्रवेश केल्यानंतर जमावाने त्यांची गाडी रोखली होती. काही क्षण ही गाडी थांबल्यानंतर त्या परत निघून गेल्या होत्या.
यादरम्यान, आंबाजोगाई कोर्टाबाहेर भीमसैनिकांनी शर्मा यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आहेत . शर्मा या शहरातून आल्या आहेत. त्या परळीत कुणाला ओळखत सुध्दा नाहीत. कोण कोणत्या जातीचा आहे हे त्यांना माहीतपण नाही त्यामुळं त्या कशाला कुणाला जातीवाचक शिवीगाळ करतील?
दलित समाजाला पुढे करून शर्मा यांच्या विरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलं असून हे चुकीचं आहे. दलित समाजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून ॲट्रोसिटी कायद्याचाही गैरवापर असल्याचं भीमसैनिकांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App