विशेष प्रतिनिधी
पुणे : भाऊ कदम हे उत्तम अभिनय शैलीद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवतात. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. सध्या ते करुन गेलो गाव या नाटकामुळे चर्चेत आहेत. नुकतंच सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते अभिनेते अशोक सराफ यांची भेट घेताना दिसत आहेत. मात्र या भेटीत अशोक मामांनी भाऊ कदम यांना बसायला सांगितलं नाही, यावरुन नेटकरी नाराज झाले आहेत. आता नुकतंच भाऊ कदम यांनी यावर भाष्य केले. Ashok Saraf and Bahu Kadam news
सध्या सोशल मीडियावर भाऊ कदम आणि अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भाऊ कदम हे अशोक सराफ यांची भेट घेताना दिसत आहे. मात्र यावेळी भाऊ कदम हे बराच वेळ उभे असल्याचे प्रेक्षकांच्या लक्षात आलं. त्यामुळे या भेटीत अशोक सराफ यांच्या वागण्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मामांनी किमान भाऊंना बसायला सांगायला हवं होतं, ते असं का वागले, अशा कमेंट या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.
View this post on Instagram A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)
A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)
आता त्यावर भाऊ कदम यांनी स्पष्टीकरण दिले. त्यावेळी त्यांनी घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. भाऊ कदम यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’ला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, “या व्हिडीओनंतर अनेकांना फ्रेम बघून वाटलं असेल. पण मी सांगू इच्छितो की, माझ्या नाटकाचा पहिला प्रयोग होता आणि अशोक मामा आले होते. माझ्या प्रयोगानंतर लगेचच त्यांचा प्रयोग होता. मी मेकअप काढत होतो. त्यावेळी मला एकाने सांगितलं की अरे मामा आले आहेत.”
मला चला हवा येऊ द्याच्या रिहर्सलला जायचं होतं. त्यामुळे मी पटकन भेटून येतो, असं म्हणत घाईघाईत तिथे गेलो. त्यांच्या पाया पडलो, ते बसले होते. मी म्हणालो कसे आहात, बरं चाललंय ना? त्यावर त्यांनी हो असं म्हटलं. त्यांनी मला सोमवार मंगळवार रिहर्सल आहे. हे तुम्ही कसं करता, अशी विचारपूसही केली. माझी मामांशी एवढीच चर्चा झाली. मी मामांशी गप्पा मारायला गेलो नव्हतो. मलाच घाई होती, असे त्यावेळी घडले. त्यानंतर मी त्यांच्या पाया पडलो आणि तिथून निघालो. पण लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला.” असेही त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App