जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण आणि शेलारांनी आणखी काय म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोकणातील नाणार येथे होणार रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानात जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण, मागील जवळपास सहा वर्षांपासून कोकणात नाणार येथे हा प्रकल्पन होण्यास विरोध केला गेला आहे. परिणामी या प्रकल्पातील मोठा गुंतवणुकदार असलेल्या सौदी अराम्को या तेल कंपनीने पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केल्याचे सांगितले जात आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले. Ashish Shelars criticism of Uddhav Thackeray over Nanar incident in Konkan
आशिष शेलार म्हणाले, ‘’कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे. या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे.’’
याशिवाय ‘’ १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान व सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमी नवशक्ति या वर्तमानपत्रात आली आहे. म्हणजे..? गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उबाठाने कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यावधीचे नुकसान केले?’’ असं शेलारांनी म्हटलं आहे.
◆ कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे.◆ या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे.◆ १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या… pic.twitter.com/bClTAg5SJr — ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) July 29, 2023
◆ कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे.◆ या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे.◆ १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या… pic.twitter.com/bClTAg5SJr
— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) July 29, 2023
याचबरोबर ‘’प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या? देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती? उबाठाने नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली?’’ असे प्रश्न उपस्थित करत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App