जाणून घ्या, शरद पवारांनी काय म्हटलं होतं?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकारने मुंबई पोलीस दलात मनुष्यबळाच्या टंचाईमुळे कंत्राटी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर तीन हजार कंत्राटी पोलिांची भरती केली जाणार असल्याचे राज्याच्या गृह विभागाकडून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तर या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आक्षेप नोंदवत टिप्पणी केली आहे. ज्यावर भाजपा आमदार आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिले आहे. Ashish Shelar replied to Sharad Pawars criticism regarding contract police recruitment
सध्या सणासुदीचा काळ सुरू असून या काळात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व अतिरिक्त बंदोबस्तासाठी आवश्यक असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या गरज पाहता राज्य सुरक्षा महामंडळाच्यावतीने मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार आहे. यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आशिष शेलार म्हणाले, ”शरद पवार जी, पोलीस भरती ही कंत्राटी स्वरुपाची नाही. सेवानिवृत्ती, आंतर जिल्हा बदली, कोविडचे मृत्यू, तसेच 2019, 2020, 2021 पोलिस भरती झाली नव्हती. त्यामुळे राज्यात आता 18,331 नियमित पोलिस भरती केली जात आहे. पण, प्रशिक्षण पूर्ण करुन त्यांना सेवेत दाखल व्हायला विलंब लागतो. नियमित पोलिस भरती होईस्तोवर पोलिस दलाला वार्यावर सोडता येणार नाही. म्हणूनच नवीन भरती करून, त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन सेवेत दाखल होईस्तोवर तात्पुरते म. रा. सुरक्षा महामंडळाकडून मनुष्यबळ घेतले जात आहे.”
याचबरोबर, ”केवळ मनुष्यबळ नाही, म्हणून मुंबईची सुरक्षा वार्यावर सोडता येणार नाही. कुठल्याही स्थितीत पोलिस भरती कंत्राटी स्वरूपाची होणार नाही, हे आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सुद्धा सांगितले आहे. आरोप करा. पण निव्वळ राजकारणासाठी खोटे आरोप करण्यात काहीही अर्थ नाही.” असं शेलारांनी म्हटलं आहे.
शरद पवार काय म्हणाले? –
कंत्राटी नियुक्तीमुळे अनुसूचित जाती,जमाती आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळू शकणार नाही. शिवाय महिलांनाही डावललं जाऊ शकतं. करारावर नियुक्ती ही काहा कालावधीपुरती असेल परंतु तो ठराविक कालावधी संपल्यानंतर त्या व्यक्तीला नोकरी सोडावी लागेल. पोलीस खात्यात कंत्रीट पद्धतीने नियुक्त केलेली व्यक्ती, तेवढी तत्परतेने काम करेल, असे मानणे मूर्खपणाचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App