नाशिक : Ashish Shelar ठाकरे बंधूंच्या ऐक्याचा आशिष शेलार यांनाच पहिला राजकीय धोका, म्हणून केली हीन पातळीवर जाऊन टीका!!, असे आज घडले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्री आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी मनसेवर टीका करताना मनसैनिकांची तुलना पहलगाम मधल्या जिहादी दहशतवाद्यांशी केली. दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना मारले तुम्ही भाषा विचारून हिंदूंना मारताय, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.Ashish Shelar compares MMS workers with Pahalgam jihadi attackers
वास्तविक मनसेवर टीका करताना आशिष शेलार यांच्यासारख्या वकिलाने भाषेचे तारतम्य बाळगायला पाहिजे होते. महाराष्ट्रातल्या कुठल्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची तुलना पहलगाममधल्या हल्लेखोर जिहादी दहशतवाद्यांशी करायचे काही कारणच नव्हते. पण ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या प्रयत्नांमुळे आशिष शेलार “बिथरले” आणि त्यांनी हीन पातळीवर उतरून टीका केली.
ठाकरे बंधूंच्या ऐक्याचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धोका आहे, असे राजकीय विश्लेषण अनेकांनी केले. पण प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईत आज तरी दुय्यम भूमिकेत असून प्रथम किंवा मुख्य भूमिकेत आज भाजप आहे. आणि मुंबई भाजपची धुरा अध्यक्ष म्हणून आशिष शेलार यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे फडणवीस मंत्रिमंडळातले मंत्री पद देखील आहे. ठाकरे बंधूंच्या ऐक्याचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सकारात्मक परिणाम झाला, तर त्याचे राजकीय दुष्परिणाम पहिल्यांदा भाजपवर होतील आणि नंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर होतील. मुंबई भाजपचे नेतृत्व म्हणून आशिष शेलार यांच्यावर त्याचा राजकीय परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मुंबई किंवा अन्य महापालिका निवडणुकांचा निकाल हा थेट मुख्यमंत्रीपदावर परिणाम करणारा नसेल, पण तो ज्यांच्याकडे शहर पातळीवरची किंवा स्थानिक पातळीवरची भाजप पक्ष संघटनेची जबाबदारी असेल, त्यांच्यावर मात्र परिणाम करणारा असेल. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर आदी महापालिकांच्या निवडणुकांवर अरे बंधूंच्या ऐक्य परिणाम करणारे ठरणार असेल, तर ते तिथल्या स्थानिक भाजप नेतृत्वाला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही.
म्हणूनच ठाकरे बंधूंच्या ऐक्यामुळे भाजप मधल्या इतर नेत्यांपेक्षा आशिष शेलार जास्त बिथरले आणि त्यांनी खालच्या पातळीवर उतरून मनसेच्या कार्यकर्त्यांची तुलना पहलगाम मधल्या जिहादी दहशतवाद्यांशी केली.
राणे पिता – पुत्र, दरेकर यांचीही टीका, पण…
ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर भाजप मधल्या भाजप मधल्या अनेक नेत्यांनी ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर तुफान टीका केली. नारायण राणे, प्रवीण दरेकर, नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना अजिबात सोडले नाही. त्या भाजपमध्ये असलेल्या जुन्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना ठोकून काढले. पण या नेत्यांनी आशिष शेलार यांच्या सारखी पातळी सोडली नाही किंवा त्यांनी कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी केली नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. राज ठाकरे यांना सॉफ्ट कॉर्नर दिला पण शिंदे यांच्या शिवसैनिकांपैकी कुणीही शिवसेना किंवा मनसे यांच्या कार्यकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी केली नाही. ती फक्त आशिष शेलार यांनी केली. त्यामुळे मनसेने देखील त्यांना तुफान ठोकून काढले. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आशिष शेलार यांना तोडीस तोड उत्तर दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App