प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यात समन्वय राहावा म्हणून भाजपचे अनेक उपाध्यक्षंपैकी एक उपाध्यक्ष आशिष कुलकर्णी यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, आशिष कुलकर्णी यांची राजकीय भूमिका केवळ समन्वयक या पुरतीच मर्यादित नसून ते आता मुख्यमंत्री कार्यालयातले “भाजपचा माणूस” म्हणून काम करत आहेत आणि इथेच आशिष कुलकर्णीच्या राजकीय महतीची कल्पना यावी. कुलकर्णी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात.Ashish Kulkarni BJP Man in Maharashtra Chief Minister Office
शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप होत नव्हते तेव्हा आशिष कुलकर्णी हे नाव उघडपणे चर्चेत आले. तोपर्यंत राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा विजय ही “कामगिरी” त्यांच्या खात्यात ठळकपणे होती. त्यानंतर मात्र “द मॅन बिहाइंड” याची चर्चा उघड व्हायला लागली. एकनाथ शिंदे यांचा सुरत – गुवाहाटी – गोवा – मुंबई या दौऱ्यात समन्वयाचे काम त्यांनी केले, असे काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. पण आशिष कुलकर्णी आता त्या पुढे जाऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयात भाजपचे “भाजपचा माणूस” म्हणून काम करताना दिसत आहेत.
शिंदे गट आणि भाजपमधील आमदार आणि मंत्र्यांमध्ये सुसंवाद ठेवण्याचं आणि शिंदे गटातील आमदारांच्या समस्या सोडवण्याचे काम कुलकर्णी यांच्याकडे असेल, असं सूत्रांनी सांगितले.
राज्यसभा निवडणुकीच्यावेळी भाजपचा उमेदवार निवडून आणण्यामागे कुलकर्णी यांचा मोठा हात असल्याचं सांगितलं जातं. राज्यसभा निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांची एक टास्क फोर्स नेमला होता. त्यात कुलकर्णी यांच्या बरोबर फोर्समध्ये गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांचा समावेश होता. विधान परिषद निवडणुकीत भाजपची रणनिती आखण्यात आशिष कुलकर्णी यांनी महत्वाची भूमिका वठवली होती. महाराष्ट्रातील सत्तांतरासाठी गुप्त हालचाली झाल्या त्यावेळी आशिष कुलकर्णी हे पडद्यामागचे सूत्रधार होते.
शिवसेना व्हाया काँग्रेस ते भाजप
आधी शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता भाजप असा आशिष कुलकर्णी यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. शिवसेनेत असताना ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे होते. काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि पक्षाच्या थिंकटॅंकमध्ये आशिष कुलकर्णी यांचा समावेश होता. कुलकर्णी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. कुलकर्णी सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App