प्रतिनिधी
मुंबई : लोकमत मॅन ऑफ द इयरच्या मुलाखतीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नेत्यांना सल्ला दिला. त्यापैकी अजित पवारांना दिलेला सल्ला विशेष गाजतो आहे. अजित पवारांनी जसे बाहेर लक्ष ठेवले आहे, त्यापेक्षा जास्त लक्ष त्यांनी त्यांच्या काकांवर लक्ष ठेवावे, असा खोचक सल्ला राज ठाकरे यांनी अजितदादांना दिला होता. त्यावर आज अजितदादांनी प्रत्युत्तर दिले आहे, तेही तितकेच खोचक आहे. राज ठाकरेंनी जसे आपल्या काकांकडे लक्ष ठेवले, तसेच मी पण आपल्या काकांकडे लक्ष ठेवीन, असा प्रतिटोला अजितदादांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.As Raj Thackeray looked after his uncle, I will also look after my uncle
लोकमत मॅन ऑफ द इयर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. ती सध्या महाराष्ट्रात गाजत आहे.
त्यामध्ये अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना वेगवेगळे नेत्यांची नावे घेऊन त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?, असा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर देताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जपून वागावे. देवेंद्र फडणवीस यांनी घराकडे थोडे लक्ष द्यावे. त्याचबरोबर अजित पवार बाहेर लक्ष देतात त्यापेक्षा जास्त लक्ष काकांकडे ठेवावे, असा सल्ला दिला होता. त्यावर अजितदादांनी वर उल्लेख केलेले प्रत्युत्तर दिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App