केंद्र सरकारने नर्सिंग कॉलेजसाठी १५७० कोटी रुपये मंजूर केले
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी मंत्रिमंडळाने बुधवारी नर्सिंग कॉलेजबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याच संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी मोदी सरकारच्या कॅबिनेट बैठकीत राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण(National Medical Device Policy) 2023 ला परवानगी दिली आहे. देशात शक्य तितक्या लवकर १५० हून अधिक नर्सिंग महाविद्यालये उघडली जातील. एका नर्सिंग कॉलेजसाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. Big decision of Modi government More than 150 nursing colleges will be opened across the country
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात १५७ नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत. जिथे वैद्यकीय महाविद्यालये आहेत, तिथे १० कोटी रुपये खर्चून नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशात एमबीबीएसच्या १ लाख ६ हजार जागा आणि बीएससी नर्सिंगच्या १ लाख १८ हजार जागा आहेत. दरम्यान, B.Sc नर्सिंगची मागणी वाढल्याने नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
#WATCH | Today decision has been taken to open 157 new govt medical nursing colleges in the country… Rs 1,570 crore has been approved for this and it will be completed in the next 24 months: Union Health Minister Mansukh Mandaviya pic.twitter.com/ifxTHyGdLJ — ANI (@ANI) April 26, 2023
#WATCH | Today decision has been taken to open 157 new govt medical nursing colleges in the country… Rs 1,570 crore has been approved for this and it will be completed in the next 24 months: Union Health Minister Mansukh Mandaviya pic.twitter.com/ifxTHyGdLJ
— ANI (@ANI) April 26, 2023
मनसुख मांडविया पुढे म्हणाले की, देशातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांव्यतिरिक्त जगभरातील रुग्णालयांमध्ये बीएससी नर्सिंगला मागणी आहे. या पार्श्वभूमीवर मोदी मंत्रिमंडळाने नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने नर्सिंग कॉलेजसाठी १५७० कोटी रुपये मंजूर केले आहेत. पुढील दोन वर्षांत नर्सिंग कॉलेज सुरू होतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App