विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून इतिहासात उद्धव ठाकरे यांची नोंद होईल, अशी जहरी टीका भाजपचे नेते निलेश राणे यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही नागरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने जिंकतील, याची मला खात्री आहे. विरोधकांनी भांडणे लावायचा प्रयत्न केला तरी तो सफल होणार नाही. त्यांची उंची तेवढी त्यांची अक्कल तेवढीच आहे, अशी टीका आज निलेश राणे यांनी कुडाळ येथे केली. As a passive CM Note by Uddhav Thackeray
आपल्याला डेवलपमेंट हवी, भांडण नको आहे. रिझल्टच्या दिवशी चारी चारी नगरपंचायतीने भारतीय जनता पक्षात विजय होईल असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिवसेनेचे जरी असले तरी महाराष्ट्राला त्यांचा काय उपयोग नाही. चाळीस दिवस घरी बसले आणि स्वतःचा चार्ज देखील कोणाला दिलेला नाही. असे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कामाचे नाहीत. पण, आमदार म्हणूनही ते कामाचे नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App