आर्यन खानच्या जेवणा – झोपण्याची काळजी करणारे सरकार २८ एसटी कामगार गेले तरी बेपर्वा; गोपीचंद पडळकर यांचे टीकास्त्र

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारला गांजावाल्या, ड्रग्जवाल्या लोकांची काळजी आहे. आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणात मंत्र्यांनी सकाळ, दुपार, संध्याकाळ पत्रकार परिषद घेतली. मात्र आत्महत्या २८ एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या तरी ठाकरे – पवार सरकार बेपर्वा असल्याचे टीकास्त्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोडले आहे.Aryan Khan’s meals – the government that cares about sleeping 28 ST workers go but careless; Tikastra of Gopichand Padalkar

आज अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्याने एसटीलाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. अशा वेळी ठाकरे – पवार सरकारमधील एकही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही. मात्र हेच मंत्री आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यस्त आहेत, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपुरात लगावला.



पडळकर म्हणाले, की आर्यन खानच्या प्रकरणात ठाकरे सरकार जीवानीशी लढत होते. आर्यन जेवला का?, आर्यन काय खातोय? आर्यन कसा सुटला पाहिजे?, रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ ते पत्रकार परिषद घेत होते. ते आर्यनची बाजू घेत होते. त्यांना आर्यन महत्वाचा आहे पण २८ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते कर्मचारी त्यांना महत्वाचे नाहीत,” अशी टीका पडळकर यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे. याच प्रश्नावर कालपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. पण राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडून संप मोडीत काढला आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.‌

आतापर्यंत राज्यात अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र आत्तापर्यंत एकही राज्य सरकारचा मंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेला नाही. त्यांना कोणतीही मदत केली नाही, असा आरोपही पडळकर यांनी केलाय. “सरकारचा एकही लोकप्रतिनिधी, सरकारचा माणूस, परिवहन मंत्री किंवा कोणीही सांत्वनासाठी एसटी कर्मचाऱ्याच्या घरी गेले नाहीत, असे पडळकर म्हणाले.

ठाकरे – पवार सरकारला सगळ्या गांजावाल्या लोकांची, ड्रग्जवाल्या लोकांची काळजी लागून राहिलेली आहे. हे सरकार ड्रग्जवाल्या लोकांसाठी रात्र आणि दिवस एक करुन राबत आहे. पण जे एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत त्यांच्याबद्दल एक शब्द काढत नाहीत. उलट लोकशाही मार्गाने ते संप करण्याचा प्रयत्न करत असताना तो मोडीत काढण्यासाठी टोकाचा प्रयत्न सरकार करतेय, अशी टीकाही पडळकर यांनी केली.

Aryan Khan’s meals – the government that cares about sleeping 28 ST workers go but careless; Tikastra of Gopichand Padalkar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात