Raj Thackeray : कोर्टात वारंवार गैरहजेरीमुळे राज ठाकरेंविरुद्ध अटक वॉरंट; 2008 मध्ये कार्यकर्त्यांकडून बसवर दगडफेकीचा खटला

Raj Thackeray

विशेष प्रतिनिधी

लातूर : 16 वर्षांपूर्वी म्हणजे 2008 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी निलंगा येथे बसवर दगडफेक केली होती. त्या गुन्ह्यात राज ठाकरेंसह  ( Raj Thackeray  ) 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील सहा आरोपी न्यायालयात हजर झाले. मात्र, राज यांच्यासह दोघे हजर झाले नाही. म्हणून निलंगा न्यायालयाच्या न्यायाधीश ए. एस. गुंजवटे यांनी अटक वॉरंट जारी केले.



मनसेचे तत्कालीन कार्यकर्ते ईश्वर वसंतराव पाटील, इरफान इस्माईल शेख, म्हादू नारायण वाडीकर, वैजनाथ रमाकांत नटकरे, शंकर गोपाळराव पोतदार, विक्रम श्रीमंतराव पाटील, अभय शंकरराव साळुंके आणि राज श्रीकांत ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होता. यातील अभय साळुंके व राज ठाकरे वगळता अन्य ६ हजर झाले होते.

हजर होत नसल्याने अटक वॉरंट निघाले

सदरची केस सेशन कोर्टात चालते. परंतु या गुन्ह्यातील आरोपी असलेले अभय साळुंके व राज ठाकरे हे न्यायालयात हजर होत नाहीत. त्यामुळे जेएमएफसी न्यायालयात केस सेशन ला कमिट करता येत नाही. तसेच प्रकरण जुने असल्याने अटक वॉरंट निघाले. – सुषमा पाटील, सहायक सरकारी वकील, निलंगा न्यायालय

Arrest warrant against Raj Thackeray for frequent court absences

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात