वृत्तसंस्था
मुंबई : आरे दुग्ध वसाहतीने २८६.७३ हेक्टर अधिसूचित जागेचा ताबा वन विभागाकडे सोपविला. आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षकांकडे हा ताबा मिळाल्याने मुंबईसारख्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फुलविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Are gives 812 acre land to govt.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील आरेच्या जागेत वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय गतवर्षी सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. बोरिवलीतील आरे, गोरेगाव तसेच मरोळ मरोशी येथील क्षेत्राचा ताबा देण्यात आला आहे. आरे येथील १२५.४२२ हेक्टर, गोरेगाव येथील ७१.६३१ हेक्टर आणि मरोळ मरोशी येथील ८९.६७९ हेक्टर इतकी जागा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली.
याव्यतिरिक्त मरोळ मरोशी गावातील ४०.४६९ हेक्टर जागा यापूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात देण्यात आली आहे. यासंदर्भात राखीव वन क्षेत्राबाबत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येऊन त्यावर सुनावणीनंतर अंतिम अधिसूचना काढण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App