विशेष प्रतिनिधी
मुंबई : निवडणुका पुढे धकलण्यासाठी अखेर सरकारने पावले उचलली आहेत. कोविड संक्रमणामुळ सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य न झाल्याने तसेच मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार Appointment of Administrators on Municipal Councils in eight districts
असल्याने संबंधित स्थानिक संस्थांमध्ये प्रशासक नियुक्त करण्याबाबतचे शासन आदेश नगरविकास विभागाने जारी केले आहेत.मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील विविध नगरपरिषदा आणि नगर पंचायतींवर प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहे.
औरंगाबाद, लातूर आणि जालन्यातील प्रत्येकी चार नगरपरिषदा, परभणीतील सात नगरपरिषदा, हिंगोलीतील तीन, बीडमधील सहा, नांदेडमधील अकरा, उस्मानाबादमधील आठ नगरपरिषदांवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, पैठण, गंगापूर, खुलताबाद , जालन्यातील जालना, अंबड, भोकरदन, परतुर, परभणीतील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, सोनपेठ, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, हिंगोली, कळमनुरी
बीडमधील बीड, आंबेजोगाई, माजलगाव, परळी, वैजनाथ, गेवराई धारूर , नांदेडमधील अर्धापूर, माहूर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, भूम, कळंब, मुरूम, नळदुर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूर, लातूरमधील उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा यांचा समावेश आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App