प्रतिनिधी
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजपने उमेदवार उभा केला होता, तेव्हा उमेदवाराच्या माघारी साठी राष्ट्रवादी काँग्रेस मनसे या पक्षांच्या नेत्यांनी त्यांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले, पण उमेदवारी मागे घेतल्यानंतर मात्र त्याच राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून भाजपवर शरसंधान साधण्यात आले आहे. Appeal to BJP to withdraw when Andheri by-election candidature
अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपच्या उमेदवारांनी माघार घ्यावी, असे आवाहन राज ठाकरे आणि शरद पवार यांनी भाजपच्या नेत्यांना केले होते. रमेश लटके यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या उमेदवार आहेत. त्यांच्या कुटुंबातला सदस्य निवडणुकीला उभा राहत असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पालन करून भाजपने उमेदवार मागे घ्यावा, असे आवाहन शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन, तर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केले होते.
या आवाहनाला भाजपने प्रतिसाद दिला. मुरजी पटेल यांना उमेदवारी देऊन नंतर त्यांना माघार घ्यायला लावली. त्यांची माघारी झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीतून मात्र भाजपने पराभवाच्या भीतीने उमेदवारी मागे घेतल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला पराभवाची भीती असल्याने माघार घेतल्याची टीका केली आहे, तर शिवसेनेचे तुरुंगात असलेले प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपला पराभवाची किती असल्याचेच म्हटले होते. भाजपने अंतर्गत सर्व्हे केला आणि त्यांना अंधेरीतला पराभव दिसला म्हणूनच त्यांनी माघार घेतली, असा दावा संजय राऊत यांनी तुरुंगातून कोर्टात सुनावणीसाठी जाताना केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App