जिल्ह्यात पुणे, पिंपरी – चिंचवड शिवाय आणखी दोन महापालिका, हडपसर, चाकणमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या अजित पवार यांच्या सूचना


विशेष प्रतिनिधी

पुणे : जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शिवाय भविष्यात आणखी दोन महापालिका होणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. यासाठी चाकण आणि हडपसर परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या.Apart from Pune, Pimpri-Chinchwad two more corporations in pune district, Ajit Pawar’s instructions to build infrastructure in Hadapsar and Chakan.

पुण्यातील विधान भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पीएमआरडीएच्या विकास आराखड्याचे सादरीकरण खासदार, आमदारांना दाखवण्यात आले.यावेळी पवार म्हणाले पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार झपाट्याने हाेत आहे. हे लक्षात घेऊन भविष्यात आणखी दोन महापालिकांची उभारणी करावी लागेल.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (पीएमआरडीए) यादृ‌ष्टीने हडपसर आणि चाकण पट्ट्यात पायाभूत सुविधाांची आतापासूनच उभारणी करावी. त्यासाठी विकास आराखड्यात नियोजन करा. आणखी एक बैठक मुख्यमंत्री स्तरावर येत्या काळात होणार आहे. त्यानंतर त्यातील अनेक मागण्यांबाबत चर्चा होईल. तसेच भविष्यातील आणखी दोन महापालिकांच्या उभारणी संदर्भात देखील चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले, की गावांगावांतील रस्ते रेकॉर्डवर नसतील तर नंतर नागरिक त्यासाठी जागा देण्यास टाळाटाळ करतात. कारण त्या परिसरातील जागेचे भाव नंतर प्रंचड वाढलेले असतात. त्यामुळे नागरिक जागा देताना विचार करतात, विरोध करतात. हा आमचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे त्याची दखल पीएमआरडीएने घ्यावी.

पीएमआरडीने पुणे महापालिकेत समावेश झालेल्या २३ गावांबाबत आता विकास आराखडा केला आहे. मात्र, पुणे महापालिकेकडे आराखडा हस्तांतरण झाल्यावर त्यात ते बदल करू शकतात. पुणे आणि पिंपरी या दोन्ही महापालिका भाजपच्या ताब्यात असल्या तरी विकासाबाबत आमच्याकडून राजकारण केलं जातं नाही, याबाबत मुख्यमंत्री ही सकारात्मक आहेत, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

Apart from Pune, Pimpri-Chinchwad two more corporations in pune district, Ajit Pawar’s instructions to build infrastructure in Hadapsar and Chakan.

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात