अनुराग ठाकूर म्हणाले- क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली होणारी अभद्रता खपवून घेणार नाही, ओटीटीच्या वाढत्या अश्लील कंटेंटवर सरकार गंभीर

प्रतिनिधी

नागपूर : सर्जनशीलतेच्या नावाखाली अपमानास्पद भाषा आणि असभ्यता सहन केली जाऊ शकत नाही, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले. ओटीटीवर अश्लील कंटेंट वाढत असल्याच्या तक्रारीबाबत सरकार गंभीर आहे. याबाबत नियमांमध्ये काही बदल करण्याची गरज भासल्यास मंत्रालय मागे हटणार नाही. अश्लीलता आणि गैरवर्तन थांबवण्यासाठी आम्ही कठोर कारवाई करू.Anurag Thakur said – abuse in the name of creativity will not be tolerated, government is serious about increasing obscene content on OTT

अनुराग ठाकूर यांनी रविवारी नागपुरात पत्रकार परिषदेत हे मुद्दे मांडले. केंद्रीय मंत्री म्हणाले की, या व्यासपीठांना क्रिएटिव्हिटीसाठी स्वातंत्र्य देण्यात आले आहे, अश्लीलतेसाठी नाही. जर कोणी त्याची मर्यादा ओलांडली तर ती अजिबात स्वीकारता येत नाही. अशा प्रकरणांवर कारवाई करण्यापासून सरकार मागे हटणार नाही.



ओटीटीबाबत तक्रारी वाढल्या

यासाठी अजून प्रक्रिया बाकी असल्याचे अगुराग ठाकूर यांनी सांगितले. पहिल्या स्तरावर,निर्मात्याला तक्रारींची दखल घेऊन त्या दूर कराव्या लागतात. 90-92% तक्रारी निर्मात्यांद्वारे सोडवल्या जातात. त्यानंतर असोसिएशनच्या स्तरावर तक्रारींचे निराकरण केले जाते. मग ते शासनस्तरावर आले की मग विभागीय समितीही कारवाई करते. आम्ही नियमानुसार काम करतो.

सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर काही काळापासून तक्रारी वाढू लागल्या आहेत, त्याबाबत मंत्रालय गंभीर आहे. त्यात काही बदल करण्याची गरज भासल्यास त्याचा गांभीर्याने विचार करून निर्णय घेऊ.

राहुल गांधी चर्चेत राहण्यासाठी काहीही बोलतात

यावेळी अनुराग ठाकूर यांनी काश्मीरमधील बलात्कार पीडितांवर केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधींवर निशाणा साधला. केंद्रीय मंत्री म्हणाले की, असे काही लोक आहेत ज्यांना वाट्टेल ते बोलून बातम्यांमध्ये राहायचे आहे. जर ते गंभीर असते तर ते महिलांच्या प्रश्नावरही गंभीरपणे बोलले असते.

Anurag Thakur said – abuse in the name of creativity will not be tolerated, government is serious about increasing obscene content on OTT

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात