वृत्तसंस्था
मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी घोड्यांमधील अँटीबॉडीपासून बनवलेल्या औषधामुळे ७२ तासांत RT-PCR चाचणी निगेटिव्ह येत आहे, असा दावा कोल्हापूर येथील बायोसायन्स कंपनीने केला आहे. याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. (याबाबतची सत्यता फोकस इंडियाने तपासून पाहिलेली नाही) Antibody drug in horses causes RT-PCR test in 72 hours, claims company in Maharashtra
कोरोना उपचारांसाठी एका प्रभावी औषधाची चाचणी सुरू आहे. हे औषध सर्व मानदंडांवर प्रभावी ठरले तर कोरोनाची लक्षणे असेलल्या रुग्णांसाठी भारतात विकसित झालेले हे पहिले औषध ठरणार आहे. या औषषाचा वापर हा कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी केला जाणार आहे.
Corona Vaccine Clinical Trial Data : लसीच्या क्लिनिकल चाचणीचा डेटा सार्वजनिक करण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस
औषधाच्या प्राथमिक परीक्षणामध्ये अपेक्षा वाढवणारे निष्कर्ष समोर आले आहे. या औषधाच्या वापरामुळे ७२ ते ९० तासांमध्ये कोरोनाबाधित रुग्णाची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येत आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. सध्या या औषधाच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा सुरू आहे. तसेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ही चाचणी पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आयसीएमआरचे माजी महासंचालक प्रा. एन.के. गांगुली यांनी सांगितले की,आपण मानवी चाचणीच्या अहवालाची वाट पाहिली पाहिजे. जर हे औषध उपयुक्त असल्याचे समोर आले तर ते अधिक फायदेशीर ठरणार आहे.
आयसेरा बायोलॉजिक्सचे संचालक (न्यू प्रॉडक्ट) नंदकुमार कदम यांनी सांगितले की, कोरोना विषाणूमधून काढलेले खास अँटीजन घोड्यामध्ये इंजेक्ट करून ही अँटीबॉडी विकसित केली आहे. योग्य अँटीजन निवडण्यासाठी सीरमने मदत केली. तसेच तसेच बाधितामध्ये अँटबॉडी विकसित करणाऱ्या रसायनांची निवड करण्यासाठीही मदत केली. अँटीबॉडी विकसित करण्यासाठी घोड्यांची निवड करण्यात आली होती. कारण मोठे जनावर असल्याने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी विकसित होत असतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App