मनोज जरांगे यांचे आणखी एक पाऊल मागे; आता 10 % आरक्षण घ्यायला तयार, पण एका अटीवर!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनोज जरंगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम मार्फत चौकशी सुरू करण्याची घोषणा झाल्याबरोबर मनोज जरांगे टप्प्याटप्प्याने एक – एक पाऊल मागे घेत आहेत. शिंदे – फडणवीस सरकारने दिलेले 10 % मराठा आरक्षण स्वीकारण्याची तयारी मनोज जरांगे यांनी आज दाखवली आहे. पण त्यासाठी त्यांनी आता सरकार समोर एक अट ठेवली आहे. Another step back by Manoj Jarange

राज्य सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी ‘एससीबीसी’ आरक्षण दिले आहे. आधी हे आरक्षण मान्य नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती. आपणास ओबीसीमधून आरक्षण हवे असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता मात्र ‘एससीबीसी’चे 10 % टक्के आरक्षण घेण्याची तयारी मनोज जरांगे यांनी दर्शवली आहे. परंतु हे 10 % आरक्षण एकूण आरक्षणाच्या 50 % च्या आत घेतले पाहिजे, अशी अट मनोज जरांगे यांनी घातली आहे.

 फडणवीसांवर देखील बचावात्मक निशाणा

एक पाऊल मागे घेताना देखील मनोज जरंगे यांनी देवेंद्र फडणवीस नंबर निशाणा कायम ठेवला आहे पण आता ते बचावात्मक भाषेत आले आहेत. फडणवीस यांचा डाव यशस्वी होत नाही तोवर लढणार आहे. पावसाळी अधिवेशन सुरू होते तेव्हा एसआयटी चौकशीची मागणी झाली. त्यावेळी फडणवीस यांनी म्हटले पोलिसांचा रिपोर्ट आला आहे. त्यात एसआयटी स्थापन करायची गरज नाही, असे म्हटले होते. मग आताच का एसआयटी चौकशीचा निर्णय झाला?? कारण मी सरकारने दिलेले 10 % आरक्षण नाकारले. त्यामुळे एसआयटीची स्थापन करण्यात आली आहे. पण आम्ही राजकीय आरक्षण मागत नाही. त्यासाठी आम्ही बोलत नाही. परंतु ओबीसीमध्ये जे फायदे आहेत, ते आम्हाला मिळाले पाहिजेत, असे जरांगे म्हणाले.

एका अधिवेशनात बोलता एसआयटी चौकशी नको, दुसऱ्या अधिवेशनात एसआयटी चौकशी लावण्याचे आदेश देता. न्यायालय सांगते शांततेत आंदोलन करा. मग आम्ही शांततेत आंदोलन केले. मात्र गुन्हे दाखल केले जात आहे. खुन्नस दाखवली जात आहे. तुम्ही फुगे फोड्याची बंदूक दाखवता. मात्र मराठे घाबरत नाही, अशा भाषेत जरांगे यांनी आज उत्तर दिले.

 मग तुम्हाला ‘अहो जाओ’

अरे कारे केलं म्हणालो, अशी टीका माझ्यावर झाली. मग अहो जाओ केल्यानंतर सगे सोयऱ्याची मागणी पूर्ण करणार का?? मग रोज अहो जाओ करतो. मराठ्यांना सांगतो यांना अहो जाओ करा. एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांच्याकडून अपेक्षाही आहे. पण त्यांनीही समाजाची नाराजीची लाट ओढून घेऊ नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे सांगितले. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, त्यांची भावना समाजाच्या प्रती बरोबर आहेत. परंतु सध्या ज्वलंत मुद्दा असताना राजकीय निर्णय नको. माझा तो मार्ग नाही. माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा आरक्षण आहे.

Another step back by Manoj Jarange

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात