वृत्तसंस्था
मुंबई : हिंडेनबर्गच्या वादात अडकलेल्या आणि नुकसान सोसणाऱ्या अदानी समूहाकडून गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, मंगळवारी समूहाच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले की, त्यांनी सुमारे 7,374 कोटी रुपये (901 मिलियन डॉलर) च्या शेअर-आधारित कर्जाची मुदतपूर्व परतफेड केली आहे.Another big move by Adani Group, early repayment of Rs 7300 crore loan, bid to win back investor confidence
शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहावरील कर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर समभागांमध्ये सतत घसरण होत असताना अदानी समूहाने आपली रणनीती बदलण्यासाठी रोख बचत आणि कर्जाची परतफेड करण्यावर लक्ष केंद्रित केले.
याआधीही फेडले कर्ज
अदानी समूहाचे मुदतपूर्व कर्ज परतफेडीचे हे पाऊल प्रवर्तकांच्या आश्वासनानुसार आहे आणि त्याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या विश्वासावर दिसून येईल अशी अपेक्षा आहे. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (एपीएसईझेड) ने यापूर्वी एसबीआय म्युच्युअल फंडाला 1,500 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली होती. अदानी समूहाच्या या पावलाकडे गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्याचे प्रयत्न
अदानी समूह आपल्या गुंतवणूकदारांमध्ये विश्वास परत आणण्याचा सतत प्रयत्न करत आहे. हिंडेनबर्गच्या संशोधन अहवालाने या समूहाला चांगलाच हादरा दिला होता. सप्टेंबर 2022 मध्ये अदानी समूहावरील एकूण कर्ज 2.26 लाख कोटी रुपये होते. हिंडेनबर्ग अहवालात उपस्थित केलेल्या 88 प्रश्नांमध्ये स्टॉक मॅनिप्युलेशनपासून समूहाच्या प्रचंड कर्जापर्यंत गंभीर आरोप होते. मात्र, हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांनी अदानी समूहाकडून 400 पानांच्या उत्तरात सर्व आरोप निराधार असल्याचे सांगण्यात आले.
मार्केट कॅपमध्येही वाढ
24 जानेवारी 2023 रोजी हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानींच्या गुंतवणूकदारांच्या भावनेवर झालेल्या परिणामामुळे त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये त्सुनामी आली, जी महिनाभर सुरू राहिली. अदानी समूहाचे बाजार भांडवल 12 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 100 अब्ज डॉलरवर पोहोचले होते. तथापि, गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये, अदानीच्या शेअर्समध्ये जोरदार रिकव्हरी झाली आहे आणि दररोज ते हिरव्या निशाणावर बंद होत आहेत. यादरम्यान अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्येही 2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ताज्या रिकव्हरीनंतर, 27 फेब्रुवारी रोजी सुमारे 6.82 लाख कोटी रुपयांची नोंदणी झालेली मार्केट कॅप 6 मार्च रोजी वाढून सुमारे 8.85 लाख कोटी रुपये झाली.
अदानींची नेटवर्थही वाढली
गौतम अदानी यांची एकूण संपत्तीही वाढत आहे आणि ब्लूमबर्गच्या मते, ते आता 52.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत 24 व्या स्थानावर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे हिंडेनबर्गच्या त्सुनामीमुळे अदानीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 25 ते 85 टक्क्यांची घसरण झाली होती आणि याचा थेट परिणाम समूहाच्या बाजार मूल्यावर होत होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App