ED ची पहिलीच नोटीस येताच अनिल परब पत्रकारांसमोर; म्हणाले नोटीस अपेक्षितच, कायदेशीर उत्तर देईन!!; अनिल देशमुखांना ED च्या ५ नोटिसा, पण…

प्रतिनिधी

मुंबई – ED ची नोटीस मला मिळाली आहे. पण त्या नोटिशीत कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख नाही. तो कळला की मी त्यांना कायदेशीर उत्तर देईन, असे ठाकरे – पवार सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज सायंकाळी स्पष्ट केले. अनिल देशमुखांना ईडीच्या ५ नोटिसा येऊनही ते ईडीसमोर हजर झालेले नाहीत. त्यांनी पत्रकारांसमोर येऊन आपली भूमिकाही स्पष्ट केलेली नाही. Anil Parab to give legal answer to ED on its notice to remain present on 31 aug.

मनी लॉड्रींग प्रकरणात ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी स्वतः पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की आज संध्याकाळी मला ईडी ची नोटीस मिळालेली आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकरणाची उल्लेख नाही. केवळ ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता, आमच्या कार्यलायात आपण हजर व्हावे, असे त्यामध्ये म्हटले आहे. या व्यतिरिक्त त्यामध्ये असा कुठलाही विशेष उल्लेख केलेला नाही. त्यामुळे कशाच्या संदर्भात आहे. हे आता मला सांगता येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत मला ते समजत नाही, की नोटीस कशासंदर्भात आहे. त्यामुळे त्याचे उत्तर देणे कठीण आहे.



जी काही कारणे कळतील, त्यावेळी त्याचं कायदेशीर उत्तर काय असेल ते मी देईन. या सर्व घडामोडींवर मी कायदेशीर अभ्यास करून त्याबाबतचा निर्णय घेईन. कायदेशीर नोटीस आली आहे, त्याला कायदेशीररित्या उत्तर दिले जाईल.” असेही परब यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट चालकांकडून १०० कोटींच्या खंडणी वसूली प्रकरणात अनिल देशमुखांना ईडीच्या ५ नोटिसा येऊनही ते ईडीसमोर अद्याप हजर झालेले नाहीत. त्यांनी पत्रकारांसमोर येऊन आपली भूमिकाही स्पष्ट केलेली नाही. ते दर नोटिशीच्या वेळी आपले वकील इंदर पाल सिंग यांच्याकरवी ईडी कार्यालयाला उत्तरे पाठवत असतात. ५ ही नोटिसांच्या बाबतीत हेच घडले आहे.

Anil Parab to give legal answer to ED on its notice to remain present on 31 aug.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात