एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्याच्या जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.अस देखील अनिल परब म्हणाले.Anil Parab meets Sharad Pawar; These issues were discussed
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.दरम्यान राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार भेट घेतली आहे.
ही भेट वरळीतील एका हॉटेलमध्ये सुरू होती.यावेळी त्यांच्यात चार तास चर्चा झाली.या चर्चेनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी परब म्हणाले की , महत्वाची बाब म्हणजे ‘शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत एसटी संप मिटवण्याबाबत कोणत्या उपाययोजना करू शकतो याबाबत चर्चा केली आहे.
पुढे परब म्हणाले की, अजूनही कोणताही ठाम निर्णय झालेला नाही. तसेच चर्चेत अनेक मुद्दे, पर्याय समोर आले आहेत.समितीसमोर काय बाजू मांडावी याबाबतही पवारांनी चर्चा केली. एसटीचे उत्पन्न वाढविण्याबाबत चर्चेत अनेक विषय निघाले असल्याचे परब यांनी सांगितले.
तसेच गेल्या अनेक दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्याच्या जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.अस देखील अनिल परब म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App