देशमुख विरुद्ध फडणवीस आरोपांची सरबत्ती; पण पुराव्यांऐवजी नुसतीच रंगली फोटोंची जुगलबंदी!!

Anil deshmukh × devendra fadnavis targets each other but with only old photos

विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशमुख विरुद्ध फडणवीसांची चालू आहे आरोपांची सरबत्ती; पण पुराव्यांऐवजी नुसतीच रंगली फोटोंची जुगलबंदी!!, असे म्हणायची वेळ अनिल देशमुखांच्या पत्रकार परिषदेने आणली. Anil deshmukh × devendra fadnavis targets each other but with only old photos

अनिल देशमुखांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर जुनेच आरोप केले. समित कदमांचे नाव त्यांनी कालच घेतले होते. आज फडणवीस + समित कदमांचे काही फोटो दाखविले. यात कदमांचे पत्नी फडणवीसांना राखी बांधत असल्याचाही फोटो आहे. बाकीचे 2 – 3 फोटो आहेत.

अनिल देशमुखांनी फडणवीसांवर आरोप मात्र जुनेच केले. फक्त आकडा 100 कोटींऐवजी 300 कोटींचा सांगितला. उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 300 कोटी गोळा करायला सांगितले. आदित्यचा दिशा सालियन प्रकरणात अडकवा. अजितदादा आणि पार्थ पवार यांच्यावर पण आरोप करा. या सगळ्या 4 प्रतिज्ञापत्रांवर सह्या करा, अशी फडणवीसांची ऑफर घेऊन समित कदम भेटल्याचा दावा देशमुखांनी केला. पण पुरावे म्हणून फक्त फडणवीस + कदमांचे फोटो दाखविले. ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप सादर केल्या नाहीत.

Anil deshmukh × devendra fadnavis targets each other but with only old photos

देशमुखांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपकडून चित्रा वाघ समोर आल्या. त्यांनी शरद पवार + पतंगराव कदम आणि समित कदम यांचा एकत्रित फोटो ट्विट केला. आम्ही तयार आहोत. देशमुखांचा तीन तासात पर्दाफाश करू, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला. देशमुखांनी दाखविलेल्या फोटोंना चित्रा वाघ यांनी दुसरा फोटो दाखवूनच प्रत्युत्तर दिले. त्यामुळे देशमुख विरुद्ध फडणवीसांची आरोपांची सरबत्ती रंगली, प्रत्यक्षात पुराव्यांऐवजी नुसतीच फोटोंची जुगलबंदी रंगली!!

Anil deshmukh × devendra fadnavis targets each other but with only old photos

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात