वृत्तसंस्था
मुंबई : सचिन वाझे माफीचा साक्षीदार, अनिल देशमुखांसह किती जणांच्या अडचणी वाढवणार?, असा सवाल महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. त्याला कारणही तसेच झाले आहे. सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज सीबीआयच्या विशेष कोर्टाने मंजूर केला आहे. Anil Deshmukh will increase the problems of many people
ठाकरे – पवार सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कथित खंडणी प्रकरणात आता माजी पोलीस अधिकरी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयात स्वतः वाझेने अर्ज दाखल केला होता. या अर्जाला विशेष सीबीआय न्यायालयाने मंजुरी दिली आहे. यामुळेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मंगळवारी सचिन वाझेला सीबीआयच्या विशेष सत्र न्यायालयापुढे व्हीसीद्वारे हजर करण्यात आले होते. त्यामध्ये सचिन वाझेला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आले आहे. 7 जूनच्या सुनावणीत वाझेला प्रत्यक्ष न्यायालयापुढे हजर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. या प्रकरणात आता सचिन वाझे नियमित जामीनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे.
100 कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या लोकांबद्दल आपल्याकडे असलेली माहिती देण्यास तयार असल्याचे वाझेने सांगितले आहे. यासाठी आपल्याला माफीचा साक्षीदार करावे, असे त्याने न्यायालयात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे. त्याचा हा अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने काही अटी-शर्तींसह मंजुरी दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App