वृत्तसंस्था
मुंबई : 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत असलेले ठाकरे – पवार सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख अचानक आर्थर रोड तुरुंगात चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणण्यात आले आहे. त्यांचा बी.पी. वाढला आहे. तसेच ई.सी.जी. Abnormal आला असून तज्ज्ञ डॉक्टरांचा चम्मू त्यांची तपासणी करीत आहेत. अर्थात या संदर्भात जे जे रुग्णालयाकडून अजून अधिकृत माहिती आलेली नाही. Anil Deshmukh fainted in jail
काही दिवसांपूर्वी असाच त्रास होत असल्याने त्यांना सुरुवातीला जेजे रुग्णालयात आणि नंतर केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
Anil Deshmukh : अनिल देशमुख तुरुंगात खांद्यावर पडून रुग्णालयात दाखल; सीबीआयचा ताबा लांबणीवर!!
या आधी 17 ऑगस्टला अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात ईडीचे वकील युक्तीवाद करणार होते. मात्र अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल यांची तब्येत खराब असल्याने याचिकेवरची सुनावणी तहकूब केली होती. आता या याचिकेवरची सुनावणी 29 ऑगस्टला होणार आहे. मात्राचा अनिल देशमुख चक्कर येऊन तुरुंगात पडल्यामुळे आणि त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यामुळे ही सुनावणी नेमकी कधी होईल हे नंतरच स्पष्ट होईल.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी निलंबीत एपीआय सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यानी केला होता. यासंदर्भातले एक पत्र त्यांनी त्या वेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवले होते.
या प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून सचिन वाझेला अटक करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही अटक करण्यात आली आहे. हे तिघेही तुरुंगातच आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App