वृत्तसंस्था
मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या ईडीच्या कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. तसेच दुसऱ्या खंडपीठाकडे जा, अशा शब्दात फाटकारले आहे. त्यामुळे आता कोणती भूमिका घेते याकडे आता लक्ष लागले आहे. Anil Deshmukh Application About Ed Inquiry Refused By Highcourt
सीबीआय पाठोपाठ त्यांची ईडीकडून चौकशीची टांगती तलवार अनिल देशमुख यांच्यावर आहे. त्यांना दुसऱ्या खंडपीठासमोर दाद मागण्याचे न्यायमूर्ती रेवती मोहिते- ढेरे यांनी सांगितले आहे. वारंवार नोटिस बजावूनही अनिल देशमुख ईडीच्या चौकशीला सामोरे गेलेले नाहीत. या सर्व प्रकरणाविरोधात त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने हजर राहण्यासाठी दिलेला समन्स रद्द करण्याची मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली होती.
अनिल देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावत हजर राहण्यास सांगितलं आहे. परंतु ते गैरहजर राहीले. कोरोनामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रश्न विचारण्याची विनंती अनेकदा केली होती. देशमुख यांनी अर्जाद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ईडीकडे कागदपत्रे किंवा विवरणपत्र सादर करण्याची परवानगी मागितली होती. याचबरोबरच सुप्रीम कोर्टात धाव घेऊन निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने यावर १६ ऑगस्टला सुनावणी घेतली होती. त्यावर ईडीच्या कारवाईपासून देशमुख यांना कोणताही दिलासा दिला नव्हता.
परमबीर सिंह यांचे १०० कोटींच्या वसुलीचे आरोप
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीनं अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याभोवतीचा ईडीचा फास आवळला जात आहे. नुकतेच ईडीनं अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावले असून त्यांना १८ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App