विशेष प्रतिनिधी
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.महाराष्ट्र वसूली सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त अपघाती आणि गैरहजर मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, असा टोला अमृता फडणवीस यांनी लगावला आहे.Amrita Fadnavis targets Chief Minister Thackeray again
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार आदी नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी म्हणाले जनतेने आम्हाला आपले मानले.
पण सरकारने जनतेला आपले मानले नाही. दोन वर्षात राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नाही. यातून मार्ग काढू शकतं ते आमचं सरकार. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निश्चितपणे सरकार येणार. कधी येणार तेही आम्ही सांगणार नाही. थोडं गनिमी काव्यानं वागणार.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App