विशेष प्रतिनिधी
नाशिक : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नितीन गडकरी यांच्या तारुण्याचे कौतुक केले. तुम्ही खूप तरुण दिसता असे कौतुक केले. यावर कोरोना झाल्यापासून आपण रोज एक तास सकाळी व्यायाम आणि योगा करतो. त्यामुळे मी आज तंदुरुस्त आहे, असे खुद्द केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. Amitabh Bachchan praised Gadkari’s youth, Gadkari told him the secret
नाशिक येथील थीम पार्कच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, अमिताभ बच्चन आणि मी आज एका कार्यक्रमात होतो. त्यावेळी अमिताभ म्हणाले तुम्ही खूप तरुण दिसता. त्यांना मी सांगितले की कोरोना झाल्यापासून रोज सकाळी एक तास व्यायाम आणि योगा करतो. आपल्याला प्रदूषण मुक्त हवा मिळाली तर डॉक्टर ची गरज भासणार नाही पाच वर्षात मी नागपूरचे वायू आणि जलप्रदूषण संपवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात याच पध्दतीचा निर्णय घ्यायला हवा. प्रत्येक शहराच्या महापौर आणि आयुक्तांनी ठरवल्यास आपण पुढे जाऊ.
गडकरी म्हणाले, सर्व ध्वनि प्रदूषणला जबाबदार मी आहे. त्यामुळे मी लाल दिवे बंद केल. त्यामुळे बरेच जण माझ्यावर नाराज आहे. आता मी कायदा करणार आहे मर्सिडीज, बीएमडव्लू कोणतीही कार असो कर्कश आवाज चालणार नाही. अॅम्ब्युलन्स आणि पोलिसांचेही कर्कश हॉर्न चालणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App