त्या आपल्याला सोडून गेल्या… प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून काढता येणार नाही. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर रुग्णालयात संघर्ष केल्यानंतर अखेर लतादीदींनी आपला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने देशातील प्रत्येक व्यक्ती दु:खी आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही लता मंगेशकर यांना अश्रूपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. स्वरकोकिळा यांच्या निधनाने महानायक अमिताभ बच्चन यांनीही शोक व्यक्त केले.Amitabh Bachchan pays homage to Lata Mangeshkar
प्रतिनिधी
मुंबई : त्या आपल्याला सोडून गेल्या… प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून काढता येणार नाही. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर रुग्णालयात संघर्ष केल्यानंतर अखेर लतादीदींनी आपला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने देशातील प्रत्येक व्यक्ती दु:खी आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही लता मंगेशकर यांना अश्रूपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. स्वरकोकिळा यांच्या निधनाने महानायक अमिताभ बच्चन यांनीही शोक व्यक्त केले.https://tmblr.co/ZwrX5vbVZuWc8q00
लता मंगेशकर यांच्या निधनाने रसिकांना मोठा धक्का बसला आहे. याबद्दल अमिताभ यांनीही लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्या अधिकृत ब्लॉगमध्ये त्यांनी लिहिले की, “त्या आम्हाला सोडून गेल्या.. लाखो शतकांचा आवाज आपल्याला सोडून गेल्या.. त्यांचा आवाज आता स्वर्गात गुंजेल! शांतीसाठी प्रार्थना..” अमिताभ यांच्या या एका ओळीत लताजींच्या जाण्याचं दु:ख दडलंय.
बॉलीवूडकरांकडून श्रद्धांजली
अक्षय कुमार, सलमान खानपासून प्रियांका चोप्रापर्यंत सर्व सेलिब्रिटींनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लताजींसोबतचा फोटो शेअर करत सलमानने लिहिले, ‘आमच्या स्वरकोकिळा, आम्ही तुम्हाला खूप मिस करू… पण तुमचा आवाज नेहमीच जिवंत राहील.’ प्रियांका चोप्राने इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर करत लिहिले, ‘तुमचे संगीत कधीच थांबणार नाही. ओम शांती.’ लता मंगेशकर यांच्यासोबतचे त्यांचे अविस्मरणीय क्षण अनेकांना आठवले आहेत. स्वरसम्राज्ञीच्या मृत्यूने लोकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
लता मंगेशकर या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांना कोरोनाची लागण झाली. जवळपास महिनाभर त्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. उपचारादरम्यान त्यांच्या चाहत्यांनी लता मंगेशकर लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या. अखेर आज लतादीदींनी या नश्वर जगाचा कायमचा निरोप घेतला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App