विशेष प्रतिनिधी
चिंचवड : सहकार क्षेत्रात शिरलेला भाई भतीजा वाद संपवण्यासाठीच सहकार सुधारणा कायदा केल्याची बाब केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पिंपरी चिंचवड मध्ये येऊन सुनावली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवारही व्यासपीठावर हजर होते.Amit shah pledged to end dynastic politics in cooperatives
त्यांच्यासमोर जेव्हा अमित शाह यांनी सहकारात आता भाई भतीजा वाद चालणार नाही. तो बंद करण्यासाठीच सहकार कायद्यात तरतूद केली आहे, असे सांगितले तेव्हा चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात एकही टाळी वाजली नाही. पण अमित शहा यांनी हजरजबाबी पणा दाखवत एकही टाळी का वाजली नाही??, अशी विचारणा करताच व्यासपीठावरच्या नेत्यांसह सभागृहातल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. किंबहुना अमित शहा यांनी दरडावल्यावर त्यांना टाळ्या वाजवाव्या लागल्या.
आंतरराज्य सहकारिता पोर्टलच्या उद्घाटन समारंभात अमित शाह बोलत होते. त्यांनी सहकार कायद्यातील विविध सुधारणांच्या तरतुदींची तपशीलवार माहिती दिली. यातून आंतरराज्य पातळीवर सहकारामध्ये सुसूत्रता येईल, नियमांमध्ये काटेकोरपणा येईल आणि त्यातून सहकारी संस्था सहकारी साखर कारखाने, पतसंस्था यांना शिस्त लागेल. त्यांची जबाबदारी आणि उत्तरदायित्व वाढेल. ग्राहकांना उत्तम सेवा मिळेल. त्यांच्या गुंतवणुकीची विशिष्ट हमी आणि सुरक्षितता मिळेल, याकडे अमित शाह यांनी लक्ष वेधले.
अमित शाहांच्या दरडावणीची चुणूक
त्याचवेळी त्यांनी सहकारात आता भाई भतीजा वाद चालणार नाही. सहकारातला नेता आपल्या नातेवाईकांना नोकऱ्या लावू शकणार नाही. कारण नियमातच तसे आता बदल केले आहेत, असे अमित शहा यांनी सुनावले. त्यावेळी सभागृहात एकही टाळी वाजली नाही. त्यामुळे अमित शाह सजग झाले आणि त्यांनी भाई भतीजा वाद चालणार नाही असे म्हणल्यावर एकही टाळी का वाजले नाही??, अशी विचारणा केली.
त्यानंतर व्यासपीठावरच्या नेत्यांनी आणि सभागृहात बसलेल्या सहकार्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत. याचा अर्थच अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सहकार सुधारणा कायद्यातील अनेक तरतुदी महाराष्ट्रातल्या “सहकार महर्षींना” अद्याप पचवता आलेल्या नाहीत, हेच दिसून आले. पण इथून पुढे त्या पचवाव्या लागतील, याचीही अमित शहा यांच्या दरडावणीनंतर चुणूक पाहायला मिळाली. कारण अनेकांनी नंतर टाळ्या वाजवल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App