‘’अजित पवार तुम्ही दीर्घ कालावधीनंतर योग्य ठिकाणी बसलात’’ अमित शाहांचं जाहीर कार्यक्रमात विधान!

‘’तुमची हीच जागा योग्य होती, मात्र…’’ असंही अमित शाह म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

पुणे : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुणे जिल्ह्यात केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था कार्यालय या पोर्टलचे अनावरण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. Ajit Pawar you have sat in the right place after a long time Amit Shahs statement in a public event

यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत एक विधान केलं, ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अमित शाह म्हणाले, ‘’अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माझा पहिला कार्यक्रम आहे. त्यांचा सोबत माझा पहिला कार्यक्रम आहे. त्यामुळे अजित पवार यांना एक सांगतो, दीर्घ कालावधीनंतर आपण योग्य ठिकाणी बसला आहेत. तुमची हीच जागा योग्य होती. मात्र आपण खूप उशीर केला.’’

तत्पूर्वी अजित पवारांनीही पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केले, अजित  पवार म्हणाले “अमित शाह हे गुजरातमधून येतात. पण, त्यांचे महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. कारण, ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासरवाडीवर जास्त प्रेम असते. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे,”

Ajit Pawar you have sat in the right place after a long time Amit Shahs statement in a public event

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात