Amit Shah साताऱ्यात धडाडली अमित शहांची तोफ; राहुल गांधी म्हणजे खोटे बोलणारी फॅक्टरी, आमची आश्वासने पोकळ नसतात

Amit Shah

विशेष प्रतिनिधी

सातारा : Amit Shah कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगाणाच्या निवडणुकीत काँग्रेसने आश्वासनांचे पेटारे उघडले आणि निवडणुका जिंकल्या. परंतु, आश्वासने पाळली नाहीत. आता सांभाळून आश्वासने द्या, असे काँग्रेससारख्या राष्ट्रीय पार्टीचा अध्यक्ष म्हणत असेल तर ती पार्टी आश्वासने पाळू शकते का? असा सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. राहुल गांधी ही खोटे बोलणारी फॅक्टरी आहे. तरुणांनी त्यांच्या नादी लागू नये, असे आवाहनही त्यांनी केले. Amit Shah in Satara; Rahul Gandhi is a lying factory

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचार सभेत बोलताना अमित शाहा म्हणाले की, अग्निवीर ही तरुणांना बेकार करणारी नाही तर सैन्य दलाला तरुण करणारी योजना आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक अग्निवीराला परत आल्यानंतर केंद्र सरकार सीएपीएफ आणि महाराष्ट्र सरकार पेन्शनची नोकरी देईल. हे भाजपाचे आश्वासन आहे आणि मोदींची आश्वासने फसवी नसतात. मोदी बोलतात ते करतात.

आमची आश्वासने खटाखट, फटाफट सारखी नसतात

दिवंगत इंदिरा गांधींनी ‘वन रॅंक, वन पेन्शन’ योजनेचं आश्वासन दिले होते. परंतु, चाळीस वर्षात काँग्रेसने ते आश्वासन पाळले नाही. शेवटी नरेंद्र मोदींनी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. आमच्या आश्वासनांना काँग्रेसने ‘चुनावी जुमला’ म्हटले. परंतु, मोदींनी ती आश्वासने पूर्ण करून दाखवली. वन रॅंक, वन पेन्शन’ योजनेतून 1 लाख 55 हजार कोटी रुपये जवानांच्या कुटुंबांना दिले. आमची आश्वासने तुमच्या खटाखट, फटाफट सारखी नसतात, असा टोलाही शाहांनी काँग्रेसला लगावला. Amit Shah


Bhaskar Jadhav रामटेकमधील बंडखोरीवरुन भास्कर जाधवांनी काँग्रेसला सुनावले; ही काँग्रेसची नैतिक जबाबदारी नाही का?


आम्ही अयोध्येत मंदिर बांधून दाखवले

अयोध्येतील राम मंदिराचा विषय काँग्रेसने 75 वर्षे लटकवत, भटकवत ठेवल्याचा घणाघाती आरोप अमित शाहांनी केला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अयोध्यामध्ये मंदिराचे भूमीपूजन करून थांबलो नाही, तर मंदिर बांधून दाखवले. जम्मू-काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर सर्व विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. 370 कलम पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने आणला असला तरी राहुल गांधींची चौथी पिढीसुद्धा 370 कलम पुन्हा लागू करू शकणार नाही, असा सज्जड इशाराच शाहांनी दिला. Amit Shah

2019 मध्ये शिवसेनेने जनादेशाला धोका दिला

जम्मू-काश्मिरमधील दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा पुरावा मागणाऱ्यांनी टीव्हीवर पाकिस्तानी नेत्यांची पडलेली तोंड पाहिली असती तरी पुरावे मिळाले असते, असा उपरोधक टोला अमित शाहांनी राहुल गांधींना लगावला. तसेच मागील निवडणुकीत सेना-भाजप युतीलला बहुमत मिळाले होते. परंतु, शिवसेनेने जनादेशाला धोका दिला. हिंदुत्ववाद्यांना पाखंडी म्हणणाऱ्या, श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार जाऊन बसले, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

केंद्रात मंत्री असतानाही पवारांनी महाराष्ट्रावर अन्याय केला

शरद पवार या वयात देखील खोटे बोलतात. राज्यात गुंतवणूक आली नसल्याचे ते सांगत आहेत. वास्तविक देशात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली असल्याचे अमित शाहांनी ठणकावून सांगितले. महायुतीच्या काळात समृद्धी महामार्ग, मेट्रो, कृष्णा-भीमा स्थिरीकरण, महिला, शेतकरी, तरुणांसाठी योजना राबवल्या. त्यासारखे महाविकास आघाडीच्या काळातील एखादे काम शरद पवारांनी सांगावे, असे आव्हानही शाहांनी दिले. युपीए काळात शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण केंद्रात मंत्री असतानाही महाराष्ट्रावर त्यांनी अन्यायच केल्याचा आरोपही शाहांनी केला.

Amit Shah in Satara; Rahul Gandhi is a lying factory

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात