बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छापलेल्या बॅनरवर फोटो न छापल्याच्या वादातून दोघांवर हातोड्यावर मारहाण करून खुनी हल्ला करण्याचा प्रकार बिबवेवाडी परिसरात घडला आहे. या घटनेत एका तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छापलेल्या बॅनरवर फोटो न छापल्याच्या वादातून दोघांवर हातोड्यावर मारहाण करून खुनी हल्ला करणाऱ्याना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. ही घटना १९ एप्रिलला रात्री नउच्या सुमारास कात्रजमधील शिवशंभोनगरमध्ये घडली.गंगाराम काळे असे या हल्ल्यात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.Ambedkar jayanti banner not published the photo of one criminal, he attack on two youths and one youth dead during the hospital treatment
नुरूद्दीन निजामउद्दीन मुल्ला (वय २६ ) आणि रवीकिसन जरपुला (वय ३८ दोघेही रा. रा. गोकुळनगर, कात्रज ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पंडीत वंâटेनवरू (वय २० रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडीत आणि त्यांचा मित्र गंगाराम काळे हे १९ एप्रिलला रात्री पावणेनउच्या सुमारास गप्पा मारत बसले होते.
त्यावेळी तेथे आलेल्या नुरूद्दीनसह रवीकिसन याने पंडीतला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छापलेल्या बॅनरवर फोटो न छापल्याची विचारपूस केली. त्याच रागातून नुरूद्दीनने पंडीत आणि गंगाराम यांना हातोड्याने मारहाण करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग तपास करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App