सर्वपक्षीय ओबीसी मेळाव्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकमेकांकडे बोटे आणि नंतर सहकार्याचे हातही…!!


प्रतिनिधी

लोणावळा – सर्वपक्षीय ओबीसी मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी भाजप – काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांकडे बोटेही दाखविली पण त्याचवेळी राजकीय आरक्षणाच्या मागणीवर एकमत झाल्याचे दाखवून एकमेकांपुढे सहकार्याचे हातही पुढे केले. all party OBC leaders meeting for OBC political reservation

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बाबनकुळे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी ओबीसी राजकीय आरक्षणावरून एकमेकांकडे बोटे दाखविली. पण परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सहकार्य वाढविण्याचे ठरावही केले.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि महाविकास आघाडीचे मंत्री सुनील केदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या ठिकाणी हजेरी लावत आपले विचार मांडले. यावेळी ओबीसी परिषदेत काही राजकीय ठराव मांडण्यात आले. ओबीसी राजकीय आरक्षण आणि इतर प्रश्नांवर ओबीसी नेते एकत्र येण्यासाठी ही मोट बांधली जात असल्याचा आयोजकांनी म्हटल आहे. ‘जो ओबीसी का बात करेगा वही देश पे राज करेगा’ अशा घोषणा देत आज सकाळीच ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनाला सुरुवात केली.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या भाषणाच्या वेळी घोषणाबाजी झाली. पण त्यावेळी त्यांनी आपण छगन भुजबळांच्या विरोधात बोललो नसल्याचा खुलासा केला.

all party OBC leaders meeting for OBC political reservation

ओबीसी परिषदेत मांडलेले राजकीय ठराव

  • 2011 मध्ये केंद्र सरकारने इंपेरिकल डेटा केला आहे, तो राज्य सरकारला द्यावा.
  • ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र यावा यासाठी ठराव मांडत आहे. – बबनराव तायवाडे
  • हे आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशा स्वरूपाचा ठराव पारित करत आहोत – बाळासाहेब सानप
  • रिव्ह्यू पिटीशन दाखल करून इम्पेरियल डेटा केंद्र सरकारने द्यावा – बापूसाहेब भुजबळ
  • मराठा आरक्षणाला ओबीसींचा विरोध नाही. मात्र, ओबीसीमधून मराठा आरक्षण देऊ नये – रामराव वडकुटे.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात